Sunday, June 22, 2025
Home मराठी अभिमानास्पद! रितेश देशमुखच्या सिनेमाने प्रेक्षकांना लावले ‘वेड, केली बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई

अभिमानास्पद! रितेश देशमुखच्या सिनेमाने प्रेक्षकांना लावले ‘वेड, केली बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई

मराठी सिनेमाने मधल्या काही काळापासून कात टाकत नवीन उभारी घेतली आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारित उत्तमोत्तम सिनेमे बनत असून प्रेक्षक देखील त्यांना जोरदार प्रतिसाद देतात. मराठी सिनेमांचे विषय बघून अनेक मोठमोठ्या कलाकरांना या इंडस्ट्रीकडे वळण्याचा मोह होतो. रितेश देशमुखने देखील ‘लय भारी’ म्हणत मराठीमध्ये दणक्यात पदार्पण केले. आता लोकांना त्याने त्याच्या नवीन सिनेमाने अक्षरशः ‘वेड’ लावले आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा नवीन सिनेमा ‘वेड’ हा प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवीन रेकॉर्ड केले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण झाला असला, तरीही प्रेक्षकांना हा सिनेमा चित्रपटगृहापर्यंत खेचण्यात यशस्वी ठरत आहे. याच सिनेमातून जिनिलीया देशमुखने मराठीमध्ये पदार्पण केले तर रितेश देशमुखचा हा पहिलाच दिग्दर्शकीय सिनेमा आहे.

या सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल २०.६७ कोटींची कमी केली असून या निमित्ताने रितेश देशमुखने आणि त्याची प्रोडक्शन कंपनी असलेल्या मुंबई फिल्म कंपनीने सोशल मीडियावर प्रेक्षकांना धन्यवाद म्हणणारी एक पोस्ट शेअर केली आहे. रितेशने ट्विटरवर लिहिले, “पहिल्या आठवड्याचे वेड लावणारे बॉक्स ऑफिस कलेक्शन्स !!!! प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार! आपले प्रेम असेच राहू द्या! पहिल्या विलक्षण आठवड्यासाठी धन्यवाद.”

रितेशच्या ‘वेड’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख, दुसऱ्या दिवशी ३ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली. त्यानंतर रविवारी ४ कोटी ५० लाख, सोमवारी ३ कोटी रुपये, पाचव्या दिवशी २ कोटी ६५ लाख रुपये आणि सहाव्या दिवशी २ कोटी ५५ लाख रुपये कमावले. आठवडाभारत २० कोटींपेक्षा जास्त पैसा सिनेमाने कमावला. वेडने तर बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आयरा खान हाेणाऱ्या नवऱ्यासाेबत खेळली अनाेखा गेम, व्हिडिओ पाहून युजर्सने केलं ट्राेल
तुनिषा शर्माच्या आईने केला मालमत्तेचा खुलासा; म्हणाली, ‘भाड्याच्या घरात राहते…’

हे देखील वाचा