Friday, July 5, 2024

‘काश माझी मुलं त्यांना भेटू शकली असती…’ वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त रितेश झाला भावुक; मुलांसोबत वाहिली श्रद्धांजली

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. रितेश देशमुख हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो अनेकवेळा त्याची पत्नी जिनिलिया देशमुखसोबत अत्यंत मजेशीर आणि रोमँटिक व्हिडिओ शेअर करत असतो. अशातच त्याने सोशल मीडियावर असे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, जे पाहून कोणीही भावुक होईल. शनिवारी (१४ ऑगस्ट) रितेश देशमुख याचे वडील माननीय विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे. याच निमित्ताने त्याने तसेच त्याच्या मुलांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

रितेश देशमुख याचे वडील दिवंगत माननीय विलासराव देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. ते कांग्रेस पक्षाचे नेते होते. त्यांचे निधन १४ ऑगस्ट २०१२ साली झाले. आज त्यांची ८ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त रितेश तसेच त्याच्या मुलांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (riteish deshmukh share a photo and video while remembring his father on his death aaniversarry)

रितेशने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्याची दोन मुले त्याच्या वडिलांच्या फोटो समोर हात जोडून उभी आहेत. हा फोटो शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “जर हे त्यांना भेटू शकले असते.” यासोबतच त्याने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या वडिलांच्या पुतळ्यापाशी श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहे. रितेशच्या दोन्ही मुलांचा जन्म विलासराव देशमुख यांच्या मृत्यूनंतर झाला आहे. त्यामुळे त्याच्या मुलांना आजोबांचा सहवास मिळाला नाही.

रितेश देशमुखने अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘तुझे मेरी कसम’, ‘धमाल’, ‘हाऊसफुल’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘एक विलन’, ‘माउली’, ‘मस्ती’, ‘बाघी ३’ यांसारख्या चित्रपटात तो दिसला आहे. तसेच त्याने मराठीमध्ये ‘लय भारी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिगरी यारी! अंकुश चौधरी अन् संतोष जुवेकर निघाले भटकंतीला, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

-‘हा’ दिग्गज अभिनेता नसता, तर बॉलिवूडला मिळाला नसता ‘कॉमेडीचा बादशाह’ जॉनी लिव्हर; वाचा त्यांचा रंजक प्रवास

-‘शेरशाह’च्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी बत्रा कुटुंबाला अश्रू अनावर; म्हणाले, ‘चित्रपटात सर्वकाही पाहायला मिळालं’

हे देखील वाचा