महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे आज आगमन झाले आहे. अनेक कलाकारांच्या घरात देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. कलाकारांनी त्यांच्या गणपती बाप्पासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. अशातच लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख याने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
रितेश देशमुखने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या मुलांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रितेश देशमुखची मुले गणपतीची आरती म्हणत आहेत. ते दोघेही खूप सुंदर पद्धतीने ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती म्हणत गणपतीची आराधना करताना दिसत आहेत. त्या दोघांनीही पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाचे जॅकेट घातले आहे. दोघांच्या समोर झेंडूची फुले आणि गणपतीचा आवडता पदार्थ मोदक दिसत आहेत. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे (Riteish Deshmukh share his children video on social media)
रितेशने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. दोघांचेही सगळेजण कौतुक करत आहेत. अनेकजण या व्हिडिओवर ‘गणपती बाप्पा मोरया’ अशी कमेंट करत आहेत. या आधी देखील रितेशने अनेकवेळा त्याच्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी रितेश देशमुखचे वडील आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्त त्याने त्याच्या मुलांचा त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना एक फोटो शेअर केला होता. या फोटोला देखील त्याच्या चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तो अनेकवेळा त्याच्या कुटुंबासोबत फोटो शेअर करत असतो.
रितेश देशमुखने अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘तुझे मेरी कसम’, ‘धमाल’, ‘हाऊसफुल’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘एक व्हिलन’, ‘माऊली’, ‘मस्ती’, ‘बाघी ३’ यांसारख्या चित्रपटात तो दिसला आहे. तसेच त्याने मराठीमध्ये ‘लय भारी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ
-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा
-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?