Saturday, June 29, 2024

‘काय वेडी आहेस तू’ म्हणत रितेश देशमुख भांडला ‘या’ अभिनेत्रीशी, व्हिडिओ झाला व्हायरल

बॉलिवूडमधली बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी सारा अली खान नेहमीच या ना त्या कारणांमुळे तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत येत असते. साराने खूप कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या सिनेमात ती शेवटची झळकली. त्यानंतर साराचा एकही सिनेमा २०२२मध्ये प्रदर्शित झाला नाही. असे असूनही ती मीडियामध्ये चर्चेत होती. साराचा बोलका अंदाज सर्वांनाच भावतो. अशातच तिचा आणि रितेश देशमुखचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सारा चक्क मराठीमध्ये बोलताना दिसत आहे.

नुकताच रितेश देशमुखचा ‘वेड’ हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान हिट देखील झाला. या सिनेमातील गाणी देखील तुफान गाजत आहे. सिनेमाने बॉलिवूड स्टार्स देखील चांगलीच भुरळ घातली असून, अनेक कलाकार या सिनेमातील संवाद, गाण्यांवर कलाकार रिल्स बनवत असून, ते सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सध्या सारा आणि रितेशचा एक मजेशीर व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

या व्हिडिओमध्ये रितेश साराला एक प्रश्न विचारतो, “तुम्हाला कुठल्या गोष्टीचे वेड आहे?” त्यावर सारा त्याला उत्तर देताना म्हणते, “नॉक नॉक जोक्स.” तिच्या या उत्तरावर रितेश तिच्याकडे बघतो. त्यानंतर सारा त्याला कृती करून दाखवत म्हणते, “नॉक नॉक.” रितेश उत्तर देतो, “कोण आहे?” सारा म्हणते, “अगरवाल.” मग रितेश प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारतो, “कोण अगरवाल?” त्यावर ती म्हणते, “अगर वाल नहीं होती तो घर गिर जाता.” तिच्या या जोकवर रितेश हैराण होऊन तिला म्हणतो, “काय वेडी आहेस तू!” त्यावर सारा म्हणते, “जसे तुम्ही वेडे.”

सध्या या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान लाईक्स मिळत आहे. शिवाय त्यावर नेटकरी साराच्या मराठीवर चांगलेच खुश दिसत आहे. अनेक कलाकार देखील व्हिडिओवर कमेंट्स करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आयरा खान हाेणाऱ्या नवऱ्यासाेबत खेळली अनाेखा गेम, व्हिडिओ पाहून युजर्सने केलं ट्राेल
तुनिषा शर्माच्या आईने केला मालमत्तेचा खुलासा; म्हणाली, ‘भाड्याच्या घरात राहते…’

हे देखील वाचा