Monday, July 1, 2024

रितेश देशमुखने भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केला ‘तो’ फोटो शेअर, वडिलांची आठवण काढत म्हणाला…

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधे सतत चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. रितेशने त्याच्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपले अस्तित्व जपले आहे, आज मनोरंजनविश्वातील प्रतिभावान अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. सोशल मीडियावरही त्याचा वावर बराच चांगला आहे. त्याचे आणि जिनिलियाचे अनेक रील व्हिडिओ तो सतत पोस्ट करत असतो.

सगळ्यांनाच माहित आहे की, रितेश एका राजकीय परिवारातून येतो. त्याचे वडील स्वर्गीय विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. तो जरी राजकारणात नसला तरी त्याचे बंधू धीरज देशमुख हे राजकीय क्षेत्रातील ओळखीचा चेहरा आहे. आज काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचा वाढदिवस. याच वाढदिवसाच्या निमित्ताने रितेशने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्यासोबत एक मजेशीर रील देखील शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्यांच्या तिघं भावंडांचा एक जुना फोटो फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शन देत लिहिले, “माझा लाडका धीरज देशमुख. आम्ही कायमच तुझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला असणार आहोत, तुझी ढाल म्हणून… वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझा यावर्षीचा वाढदिवस उत्तम जावो. तू असेच उत्तमोत्तम काम करत राहा आणि बाबांना तुझा अभिमान वाटेल असाच राहा”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

या पोस्टसोबतच त्याने एक रील व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो धीरज यांच्यासोबत एका गाडीत बसलेला दिसत असून, त्याने या व्हिडिओला एक फिल्टर देखील दिले आहे. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान रितेश देशमुखचा मोठा भाऊ अमित देशमुख आणि धाकटा भाऊ धिरज देशमुख हे दोघेही राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार

‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली शूटिंग, फॅन्स म्हणाले…

हे देखील वाचा