Wednesday, July 3, 2024

‘कुठेतरी प्रेक्षकांनी बदलायला पाहिजे’ म्हणत रितेशने मराठी चित्रपटांच्या अपयशावर केले भाष्य

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि खासकरून विनोदी भूमिकांनी ठसा उमटवणारा आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे आपला मराठमोळा रितेश देशमुख. हिंदीमध्ये काम करताना तो मराठीला विसरला नाही, आणि त्याने मराठीमध्ये देखील अभिनय करण्यास सुरुवात केली. मराठीमध्ये त्याने काही चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि सोबतच दिग्दर्शनात देखील पदार्पण केले. त्याच्या पहिल्या दिग्दर्शकीय सिनेमाने प्रेक्षकांना ‘वेड’ लावले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड तर रचले सोबतच मोठी वाहवा देखील मिळवली. याच सिनेमातून अभिनेत्री जिनिलिया देशमुखने देखील मराठीमध्ये पदार्पण केले.

‘वेड’ सारखे यश प्रत्येक सिनेमाच्या नशिबी नसते. खूपच कमी सिनेमे असतात ज्यांना असे स्वप्नवत यश पाहायला मिळते. रितेशने मराठीमध्ये केलेले सर्व सिनेमे चालले मात्र इतर सिनेमांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळत नाही. प्रेक्षक देखील अशा चित्रपटांकडे पाठ फिरवतात. याबद्दलच रितेशला एका मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारला गेला. ‘बरेच मराठी चित्रपट का चालत नाहीत? मराठी चित्रपट न चालण्यामागे नेमकी काय अडचण आहे?’

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

या प्रश्नाला उत्तर देताना रितेश म्हणाला, “चांगल्या कंटेंटशिवाय कोणतीच चित्रपटसृष्टी चालत नाही. सर्वांनी कंटेंटचा आदर केला पाहिजे. मात्र सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बजेट असणे आवश्यक असते. चित्रपटसृष्टीमध्ये बजेट हा खूप महत्त्वाचा विषय असतो. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो चित्रपटगृहामध्ये जाऊन आपण पाहावा असे प्रेक्षकांना वाटले पाहिजे. मात्र दुर्देवाने मराठीमध्ये असे घडत नाही. एखादा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि एखाद्याने आपण तो पुढच्या आठवड्यात जाऊन पाहण्याचा विचार केला तर पुढच्या आठवड्यात तो मराठी चित्रपट चित्रपटगृहामध्ये नसतो.”

पुढे रितेश म्हणाला, ” हिंदी चित्रपटांचा ट्रेलर पाहिला की, प्रेक्षक म्हणतात आम्हाला हा चित्रपट बघायचा आहे. पण हे बघण्याची संधी आपण मराठी चित्रपटाला देत नाही. कोणीतरी एखाद्या मराठी चित्रपटाबाबत सांगितलं तरच तो चित्रपट बघायला जायचे की नाही हे प्रेक्षक ठरवतात. हिंदी चित्रपटासारखा मराठी चित्रपटाबाबत प्रेक्षक विचार करत नाहीत. हे कुठेतरी प्रेक्षकांनी बदलायला पाहिजे. पण एखादा चित्रपट जर प्रेक्षकांना आवडला तर तो चित्रपट तुफान चालतो”.

दरम्यान रितेश आणि जिनिलिया याच्या ‘वेड’ या सिनेमाने ७० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. आता हा सिनेमा ओटीटीवर येणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

मिनी स्कर्ट आणि हॉट पॅन्ट यांचा अविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध फॅशन डिझायनरचे दुःखद निधन

जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत शाहरुख खानला स्थान, ऑस्कर विजेत्या राजामौलीचा देखील समावेश

हे देखील वाचा