Wednesday, July 3, 2024

शाहरुखच्या पठाणला छेद पाडत ‘वेड’ चित्रपटानं केली ‘इतक्या’ कोटींची कमाई, पोस्ट शेअर करत रितेश म्हणाला…

अनेकदा असे होते एखादा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला की, मराठी चित्रपटांना जागा मिळणे कठीण होते, त्यामुळे थिएटरमध्ये स्क्रिनिंग मिळवण्याासाठी भांडणही करावा लागतं हा मुद्दा दरवेळेस पाहायाला मिळत असून चर्चेचा विषय ठरतो. नुकतचं शाहरुख खान याचा पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे मराठी चित्रपटांना मोठं अपयश आलं आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून प्रेक्षकांना वेड लावणारा वेड चित्रपटाला देखिल शाहरुखच्या पठाणमुळे फटका बसणार असंही बोललं जायचं मात्र, बॉक्सऑफिसवर वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दिग्दर्शित वेड (Ved) चित्रपट (दि, 30 डिसेंबर) रोजी प्रदर्शित झाला होता, या चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राल वेड लावून ठेवलं आहे. मात्र, नुकतंच बॉक्सऑफिसवर शहरुख खान (Shahrukh Khan) स्टारर पठाण चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे अनेक चित्रपटांना मोठ्या अपयशाच्या सामोरे जावं लागलं. पठाणच्या प्रदर्शानापूर्वी वेड चित्रपटालाही याचा तोटा बसणार आहे असंही बोललं जायचं. मात्र, वेडने पठाणलाही छेद पाडत विक्रमी कमाइ केली आहे, रितेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली आहे.

वेड चित्रपट प्रदर्शीत होऊन 4 आठवडे उलटले आहेत मात्र, तरीही चाहत्यांमध्ये वेड चित्रपटाची क्रेज पाहायाला मिळत आहे. रितेशने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम उकाउंटवर पोस्ट शेअर करत वेड चित्रपटाच्या बॉक्सऑफिसच्या केलक्शनबद्दल माहिती दिली आहे. वेडने चौथ्या आठवड्यातही 6 कोटी 11 लाख रुपयाचा गल्ला जमवला आहे आणि प्रदर्शनाच्या 5 व्या आठवड्यातही 24 लाखाची कमाइ केली आहे.

ritesh deshmukh post
Photo Courtesy: Instagram/riteishd

सांगायचे झाले तर वेड चित्रपटाने तब्बल 57 कोटी 15 लाख रुपयाची छप्परतोड कमाइ केली आहे. पठाणच्या प्रदर्शनामुळे वेड चित्रपटाला किंचीतही नुसकासन झालेलं दिसत नाही. त्याशिवाय अजूनही चाहत्यांप्रती वेड चित्रपटी भुरळ लागून आहे. वेड अजून कोणता नवा रेकॉर्ड बनवेल हे सांगने खूपच महत्वाचे ठरणार आहे. त्याशिवाय शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसांमध्येच या चित्रपटाने जगभरात 300 कोटी रुपयांपर्यंत कमाई केली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा सुमन कल्यामपुर यांच्याकडून हिसकावण्यात आलं ‘ऐ मेरे वतन के लोगों’, वाचा काय आहे कारण
‘गे व्यक्तीशी लग्न…’, नीना गुप्ता यांच्या आयुष्यातील धक्कादायक प्रसंग, एकादा वाचाच

हे देखील वाचा