Wednesday, July 3, 2024

रितेश देशमुख आणि जिनिलीया यांच्याकडून ‘वेड तुझे’ गाण्यातून प्रेक्षकांना देणार खास ट्रीट

रितेश देशमुखच्या ‘वेड’ या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेडच लावले. कमाईच्या आणि लोकप्रियतेच्या बाबतीत नवनवीन रेकॉर्ड कायम करत असताना, आता या सिनेमाने ५० कोटींच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली आहे. या सिनेमातील रितेश आणि जिनिलियाचा अभिनय, संगीत, गाणी सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आणि सिनेमाला भरघोस प्रतिसाद दिला. या प्रतिसादामुळेच रितेश, जिनिलिया आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने एक हटके निर्णय घेतला असून, त्यांचा हा निर्णय प्रेक्षकांसाठी सरप्राईज ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

या ‘वेड’च्या टीमने जे सरप्राईज प्रेक्षकांसाठी तयार केले आहे ते अजून पर्यंत कोणत्याही फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही चित्रपटासाठी असे केले गेले नाही. दाक्षिणात्य चित्रपटांसाठी देखील असे कधीच केले गेले नाही. ‘वेड’ सिनेमा ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता या सिनेमामध्ये सत्या (रितेश देशमुख) आणि श्रावणी (जिनिलीया देशमुख) यांच्यावर चित्रित केलेले ‘वेड तुझे..’ या गाण्याचे नवीन व्हर्जन सामिल करण्यात येणार आहे. सोबतच काही नवे सीन्सही चित्रित करून सामिल करण्यात आले आहेत. येत्या शुक्रवारी म्हणजे 20 जानेवारीपासून चित्रपटगृहात ‘वेड’ पाहताना आता या नव्या गाण्याचा आनंद प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

‘वेड’ चित्रपटाच्या माध्यमातून हे दोघे बऱ्याच वर्षांनी एकत्र मोठ्या पडद्यावर दिसले. ‘सत्या’ आणि ‘श्रावणी’ने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. त्यामुळे आता दोघांवर पुन्हा नव्याने चित्रित केलेले ‘वेड तुझे’ हे देखील सर्वांच्या पसंतीस उतरणार यात शंका नाही. चित्रपटात आधी ‘वेड तुझे..’ हे गाणं रितेश देशमुख आणि जिया शंकर यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. त्या गाण्यानेही प्रेक्षकांवर जादू केली. त्यामुळे आता रितेश-जिनीलियावर चित्रित झालेलं ‘वेड तुझे..’ गाण्याचं नवं व्हर्जन चाहत्यांसाठी एक मोठी ट्रीट ठरणार हे नक्की.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुंडली भाग्य मालिकेमध्ये येणार २० वर्षांचा लीप, ‘हा’ मुख्य अभिनेता सोडणार मालिका?

कबीर बेदीने वयाच्या 70 व्या वर्षी 30 वर्षांनी लहान प्रेयसीसाेबत केले लग्न, वाचा संपूर्ण किस्सा

हे देखील वाचा