Friday, July 5, 2024

रितेश पांडेच्या होळीवरील नवीन गाण्याचा युट्यूबवर राडा; सनी सिंगच्या जोरदार ठुमक्यांनी गाण्याला मिळाले लाखो हिट्स

होळी यायला, रंग उडवायला अजून महिनाभर वेळ आहे, पण भोजपुरी संगीत क्षेत्रात आत्तापासूनच रंग उडायला सुरुवात झाली आहे. होळीच्या आधीच दररोज नवीन येणार्‍या भोजपुरी गाण्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या दररोज नवीन येणार्‍या गाण्यांमुळे भोजपुरी प्रेक्षक आत्तापासूनच होळीच्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गायक रितेश पांडेचे सुद्धा नवीन गाणे आले आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

रितेश पांडे हा भोजपुरी संगीत क्षेत्रातील आघाडीचा गायक म्हणून ओळखला जातो. त्याचे प्रत्येक नवीन येणारे गाणे सुपरहिट ठरत असते. आता रितेश पांडेच्या होळी स्पेशल गाण्याने सुद्धा सर्वांना वेड लावले आहे. ‘जीजा के भाई’  असे या गाण्याचे नाव असून ते युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले आहे.

गाण्यात रितेश सिंगसोबत अभिनेत्री सनी सिंगसुद्धा डान्स करताना दिसत आहे. या गाण्यात रितेश आणि सनी सिंग गुलाल उडवत होळी साजरी करताना दिसत आहेत. गाण्यात रंग उडवत आणि एकमेकांना डिवचत दोघांनीही धमाल उडवून दिली आहे.

या गाण्याच्या व्हिडिओला एका दिवसातच ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच २६ हजारांहून अधिक लाईक्स आणि २ हजारांहून अधिक कमेंट्सचा पाऊसही पडला आहे.

या गाजत असलेल्या गाण्यामध्ये रितेश पांडेने पारंपारिक कुर्ता, पायजमा आणि गळ्यात रुमाल घातला आहे, तर अभिनेत्री सनी सिंग मॉडर्न पेहरावात थिरकताना दिसत आहे. गाण्यात दाजी आणि मेहुणीची मस्ती पाहायला मिळत आहे. या व्हायरल होत असलेल्या गाण्याला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. गाण्यात नेहमीप्रमाणे रितेश पांडे आणि शिल्पी राजच्या आवाजाच्या जादूची कमाल पाहायला मिळत आहे. या गाण्याचे बोल प्रकाश परदेसीने लिहिले आहेत. भोजपुरी संगीत क्षेत्रात सध्या शिल्पी राज आणि रितेश पांडेच्या गाण्यांचीच चर्चा पाहायला मिळत आहे. दोघेही आपल्या दमदार आवाजात नवनवीन गाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा