Thursday, July 18, 2024

पडद्यावर सुपरहिरो असलेला ‘हा’ हॉलिवूड अभिनेता सामान्य आयुष्यातही आहे चाहत्यांचा खराखुरा सुपरहिरो

एका दशकाहून अधिक काळ मोठ्या पडद्यावर सुपरहिरोची भूमिका करणाऱ्या रॉबर्ट डाउनी ज्युनियरला (Robert Downey Jr) प्रत्येकजण ओळखतो. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये टोनी स्टार्क/आयर्न मॅनची दमदार भूमिका करणारा रॉबर्ट जगभरातील लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतो. त्याच्या दमदार अभिनयाचे असंख्य चाहते पाहायला मिळतात. पण फक्त पडद्यावरचं नव्हेतर हा अभिनेता एका चाहत्यासाठी खऱ्या आयुष्यातही सुपरहिरो बनला होता. हा किस्सा खूप कमी लोकांना माहित आहे. आज (४ एप्रिल ) रॉबर्टचा ५७ वा वाढदिवस. त्याच निमित्ताने हा किस्सा आपण जाणून घेणार आहोत.

२०२० च्या रीडर्स डायजेस्टमधील एका लेखात, डाना रेनहार्ट या लेखिकेने आजी आणि रॉबर्ट यांच्यातील एका प्रसंगाची आठवण करुन दिली आहे जो अनेकांना माहित नाही. लेखिकेने सांगितले की, “ती आणि तिची 80 वर्षांची आजी कॅलिफोर्नियामध्ये एका गार्डन पार्टीसाठी गेली होती. यादरम्यान तिथून परतत असताना तिची आजी घसरली, त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. आजीला दुखापत झाली होती आणि रक्तही खूप वाहत होते. हे बघून मी खूप घाबरले होते पण अचानक रॉबर्ट डाउनी ज्युनियर तिथे आला आणि त्याने आम्हाला मदत करत घाबरु नका सगळे ठीक होईल असे म्हणत धीर दिला.”

या प्रसंगाची आठवण सांगताना ती पुढे म्हणते की, “रॉबर्टने येऊन फक्त आजीला उचलले नाही, तर त्याचे महागडे क्रीम रंगाचे जॅकेट माझ्या आजीच्या जखमेभोवती बांधले. त्याचे क्रिम रंगाचे जाकीट पूर्णपणे रक्ताने माखले होते. यानंतर रॉबर्टने माझ्या आजीसोबत फ्लर्टही केला. तिच्या पायाचे कौतुक केले, ज्यामुळे तिला थोडे हसू आले.” रॉबर्ट डाउनी, आजीला हसवल्यानंतर आणि तिच्याशी फ्लर्ट केल्यानंतर, माझ्या आजीला त्रास होणार नाही याची काळजी घेतली.” डाऊनीने आजीचा हात धरला आणि तिला तिच्या स्ट्रेचरने बाहेर सोडले आणि आजीला सांगितले की, ती पार्टीतून इतक्या लवकर परत आल्याने त्याला वाईट वाटत आहे. त्यानंतर त्यांनी माझ्या आजीला कॉल करण्यास सांगितले.” या मोठ्या अभिनेत्याचे आपल्या चाहत्याशी हे प्रेमाने वागणे खरेच कौतुकास्पद होते. असे मतही या लेखिकेने व्यक्त केले होते.

दरम्यान, रॉबर्ट डाउनी २०१९ च्या ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंड गेम’ या चित्रपटात आयर्न मॅनची भूमिका करताना दिसला होता. या चित्रपटातील डाऊनीची भूमिका त्याच्या निधनाने संपवली होती. यानंतर त्याने ‘डॉलिटल’ या दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये काम केले पण ते यशस्वी झाले नाही. आता तो लवकरच दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनच्या ‘ओपेनहाइमर’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा