मागील बऱ्याच काळापासून कारण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा चर्चेत आला आहे. या चित्रपाची अनेक वैशिष्ट्ये आहे. एक तर बऱ्याच दिवसांनी करण दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. दुसरे म्हणजे रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी. तिसरे म्हणजे धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी अशी मोठी आणि तगडी स्टार कास्ट.
नुकतेच या सिनेमात इब्राहिम अली खान सहाय्यक दिग्दर्शकांच्या भूमिकेत दिसणार ही बातमी आली होती. आता नुकतंच चित्रपटाच्या टीमने आणि करण जोहरने या सिनेमाची शूटिंग सुरु झाल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत त्याने ही माहिती दिली. या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिका निभावताना दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर रॉकीची तर आलिया राणीची भूमिका निभावणार असून, या दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्रामवर शूटिंग सुरु झाल्याची माहिती दिली आहे.
या दोघांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कॅमेरामागील दृश्ये दिसत असून, यात मनीष मल्होत्रा, करण जोहर दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला करणचा आवाज येत असून, तो म्हणतो की, रॉकी आणि राणी तयार आहे, चला तर मग त्यांच्या कहाणीची सुरुवात करूया, लाइट्स…कॅमेरा… एक्शन.’ तर रणवीर सिंगने व्हिडिओ शेअर करत लिहिले, “सुरु झाली आहे रॉकी आणि राणीची अनोखी गोष्ट. आम्हाला आशीर्वाद, प्रेम द्या आणि आणि आमच्यासोबत या ह्या प्रवासात.” तो या व्हिडिओमध्ये ऍनिमल प्रिंटच्या चमकत्या आणि हटके कपड्यांमध्ये दिसत आहे.
आलियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती एथनिक अवतारात दिसत असून, तिने शिफॉन साडी, बॅकलेस ब्लाउज, कपाळावर मोठी टिकली लावलेली दिसत आहे. आलियाने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले, “एका कॅप्शनमध्ये फिट बसवण्यासाठी अनेक भावना आल्या आहेत.”
या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सिनेमा खूपच चर्चेत आला होता. नावाप्रमाणे सिनेमा देखील हटके आणि आकर्षक असणार यात वाद नाही. त्यात ५ वर्षानंतर करणने दिग्दर्शनात केलेले पुनरागमन नक्कीच आकर्षणाचा बिंदू असणार आहे. हा सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सोनाली कुलकर्णीने ‘बैरागी…बैरागी का सूती चोला…ओढ़के चली…’ म्हणत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
-नलूच्या शालूमुळे मालिकेची पोलखोल, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेच्या सीनमध्ये झाली मोठी चूक