×

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा विवाह संपन्न, ‘रोहिली’ने पुण्याच्या ढेपेवाढ्यात बांधली लगीनगाठ

मागील काही दिवसांपासून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या लग्नाची खूपच चर्चा होती. मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचा आणि तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या गायक रोहित राऊत आणि त्याची गर्लफ्रेंड असलेल्या जुईली जोगळेकर हे विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे, लग्नाच्या आधीच्या विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल वेगाने व्हायरल झाले किंबहुना होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Juilee Joglekar (@juilee.sangeet)

रोहित आणि जुईली यांनी ३१ जानेवारीला साखरपुडा केला त्यानंतर, त्यांचे संगीत, मेहेंदी आणि हळद हे कार्यक्रम देखील मोठ्या जोशात आणि थाटामाटात संपन्न झाले. त्यानंतर रविवारी म्हणजे २३ जानेवारी रोजी हे दोघं विवाहबद्ध झाले आहे. अतिशय जवळच्या आणि निवडक लोकांच्या उपस्थित या दोघांनी लग्न केले आहे. रोहित आणि जुईली यांचे लग्न नेमके कुठे होत आहे याबद्दल कोणालाही काहीच कल्पना नव्हती मात्र नंतर त्यांनी पुण्याजवळील ढेपे वाड्यात लग्न केल्याचे समजत आहे. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यांच्यावर त्यांचे चाहते आणि त्यांच्या कलाकार मित्रमंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Juilee Joglekar (@juilee.sangeet)

गेल्या आठ वर्षांपासून रोहित आणि जुईली एकमेकांना डेट करत आहेत. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्या दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोतचे फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली देखील दिली होती. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्राला ओळखीचे झाले आणि घराघरांत पोहोचले. लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वातील सर्वात ‘रॉकिंग परफॉर्मन्स’ देणारा म्हणून रोहितची ओळख बनली. त्याने इंडियन आयडलमध्ये देखील सहभाग घेतला होता. तर जुईली देखील एक गायिका असून तिने ‘सूर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये सहभाग घेतला होता.

हेही वाचा :

Latest Post