Sunday, February 23, 2025
Home मराठी झाली लगीनघाई! रोहित आणि जुईलीच्या लग्नाची चालू झाली तयारी, ‘या’ दिवशी घेणार सात फेरे

झाली लगीनघाई! रोहित आणि जुईलीच्या लग्नाची चालू झाली तयारी, ‘या’ दिवशी घेणार सात फेरे

‘सारेगमप लिटल चॅम्प्स’मधून समोर आलेला रोहित राऊत त्याने आपल्या कलागुणवर आपला स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला. त्यानंतर तो इंडियन आयडल या टीव्ही शोमध्ये देखील सहभागी होता. रोहित राऊतचा फार मोठा चाहतावर्ग आहे. रोहित राऊत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तो आणि गायिका जुईली जोगळेकर विवाहबंधनात अडकत आहेत. लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सध्या मराठी इंडस्ट्रीत अनेक अभिनेते-अभिनेत्री विवाह बंधनात अडकताना दिसत होते. त्यापाठोपाठ जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत विवाहबंधनात अडकत आहेत लग्नापूर्वीचे ग्रहमक केळवण या विधीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (rohit raut and juilee joglekkar prewedding ceremany start)

रोहित राऊत मूळचा लातूरचा आहे. तो ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या रियॅलिटी शोमधून समोर आला. त्याच्यातल्या असलेल्या टॅलेंटमुळे तो स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून गेला. तो झी मराठीवरील या शोमध्ये फायनललिस्ट होता. या शोमध्ये त्याच्या अनोख्या अंदाजामुळे त्याला फ्युचर म्युझिक डायरेक्टर म्हणून बोललं जायचं.

खरोखर त्याने म्युझिक डिरेक्टर म्हणून ‘दुनियादारी’ या सिनेमासाठी ‘यारा यारा’  हे गाणं गायलं आणि कंपोज केले. त्यानंतर लागोपाठ त्याने मराठी सिनेमाला म्युझिक डिरेक्टर म्हणून काम केलं त्यात ट्रिपल सीट, मुरंबा, ती सध्या काय करते हे सिनेमे समाविष्ट आहेत. त्यानंतर त्याने अनेक मालिकांसाठी टायटल सॉंग ही केले त्यात ‘का रे दुरावा’, ‘सांग तू आहेस ना’, ‘माझा होशील ना’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेसाठी टायटल सॉंग्स बनवले. एवढं काम करून सुद्धा त्याने आपलं नशीब हिंदी इंडस्ट्रीमध्ये जाऊन बघितले इंडियन आयडल या शोमध्ये सहभागी झाला आपल्या कौशल्याने वेगळा ठसा उमटवून स्वतःचं त्याने स्वतःच स्थान निर्माण केलं.

 

हे देखील वाचा