Wednesday, August 6, 2025
Home मराठी लईच भारी! झी मराठी पुरस्कार सोहळ्यात रोहित आणि कॅटरिनाची ‘ग्रॅंड एन्ट्री’

लईच भारी! झी मराठी पुरस्कार सोहळ्यात रोहित आणि कॅटरिनाची ‘ग्रॅंड एन्ट्री’

दर वर्षीप्रमाणे यंदाचा झी मराठी पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. ‘झी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१’ साठी अनेक कलाकार सज्ज झाले आहेत. या पुरस्कार सोहळ्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा सत्कार केला जातो. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार दर वर्षी या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपली हजेरी लावतात. अशात यंदा बॉलिवूडची काही कलाकार मंडळी इथे येणार असून या सोहळ्याची आणखीनच शोभा वाढवणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये दिगदर्शक रोहित शेट्टी आणि कॅटरिना कैफ दमदार एन्ट्री करणार आहेत. या दोघांच्या एन्ट्रीने या पुरस्कार सोहळ्यामध्ये नक्कीच चार चाँद लागतील, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. राजश्री मराठी या इंस्टाग्राम अकाउंटवर या दोघांच्या आगमनाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (Rohit Shetty and Katrina Kaif will be seen together at the Zee Marathi Awards)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कॅटरिनाने यावेळी लाल रंगाचा घागरा परिधान केला आहे. तसेच रोहित सुटा बुटात दिसत आहे. दोघांच्या आगमनावेळी सर्व चाहते त्यांचे फोटो काढताना दिसत आहेत.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी मालिकांमधील अनेक कलाकारांना नामांकन मिळाले आहे. दर वर्षी अनेक मालिका तसेच चित्रपट आणि त्यातील कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. राजश्री मराठी या इंस्टाग्राम अकाउंटवर आणखी काही कलाकारांच्या एंट्रीचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये दिप्ती केतकर, अभिनेता तानाजी गळगुंडे, चिमुकली स्वरा आणि मायरा देखील दिसणार आहेत. तसेच अभिनेता हार्दिक जोशी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि आपल्या सर्वांची लाडकी अमृता खानविलकर देखील दिसणार आहे. तसेच यामध्ये बॉलिवूडचा अभिनेता गोविंदा देखील झकास डान्स करत एन्ट्री करणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातील एका व्हिडिओमध्ये श्रेयस तळपदे रोहित शेट्टीची गळाभेट घेताना दिसत आहे. तसेच श्रेयसच्या हातामध्ये एक ट्रॉफी देखील आहे. त्यामुळे तो या पुरस्काराचा मानकरी ठरल्याच्या चर्चांना देखील उधाण आले आहे.

 

यामध्ये रोहित आणि कॅटरिना झळकणार, हे समजल्यामुळे चाहत्यांमध्ये आता हा पुरस्कार सोहळा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Video: झी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर उतरली लाडकी ‘परी’, दिसतेय खूपच सुंदर

-‘या’ दिवशी होणार झी मराठी पुरस्कार सोहळा साजरा, प्रिया मराठेने व्हिडिओ शेअर करून दाखवली डान्सची झलक

-पुरस्कार मिळवण्यासाठी ‘या’ थराला गेली होती कॅटरिना कैफ; वाचून सरकेल तुमच्या पायाखालची जमीन

हे देखील वाचा