Monday, July 1, 2024

अपघातानंतर अवघ्या 12 तासातच रोहित शेट्टी परतला सेटवर, सिद्धार्थने कौतुक करत शेअर व्हिडिओ केला

बॉलिवूडमधील प्रिसद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याची नवीन वेबसिरिज ‘इंडियन पुलिस फोर्स’च्या शुटींगवेळी दिग्दर्शकाचा अपघात झाला होता. त्यामुळे त्याच्या हाताला गंभीर जखम झाली असून त्वरित रुग्णालयात भर्ती करावं लागलं. आता दिग्दर्शकाची तब्येत ठीक आहे आणि शुटिंगच्या सेटवरही परतला आहे. रोहित सेटवर पोहोचल्यानंतर त्यांने अनेकांचे आभार मानले आणि त्याच्या तब्येतीविषयी माहिती दिली. त्याशिवाय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

दिग्दर्शक रेहित शेट्टी (Rohit Shetty) याची आगामी येणारी वेबसिरिज ‘इंडियन पुलिस फोर्स'(Indian Police Force)ची शुटिंग हैद्राबदमध्ये सुरु आहे. त्यावेळी दिग्दर्शकाचा हा अपघात झाला होता, आता मात्र, शुटिंग पुन्हा सुरु केली आहे. त्याशिवाय रोहितने सेटवरील कर्मचाऱ्यांसोबतचे काही फोटो शेअर करत माहिती दिली आहे की, “एक अजून कार पडली, मात्र, यावेळेस दोन बोटांमध्ये टाके पडले आहेत. काळजी करण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही. मी एकदम ठिक आहे. तुमचं प्रेम आणि काळजीसाठी खूप आभार.”

 

View this post on Instagram

 

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यानेदेखिल रोहित शेट्टी सोबत व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सिद्धात म्हणाला की, ‘आमच्याकडे ओजी अ‍ॅक्शन मास्टर आहेत, जे एका दुर्दैवी घटनेनंतर सेटवर परतले आहेत. अपघात होऊन अजून 12 तासही झाले नाहीत, पण ते एक रॉकस्टार आहेत आणि सेटवर परतले आहेत. त्याशिवाय अभिनेता रोहितला विचारतो की, त्याला कसं वाटतंय. सिद्धार्थने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “रोहित सरांचे अ‍ॅक्शनवरील प्रेम आणि त्यांनी दिग्दर्शित केलेल्या स्टंट्सबद्दलची त्यांची आवड याबद्दल आपल्या सर्वांना माहिती दिली आहे. काल रात्री कार स्टंट करत असताना त्यांचा अपघात झाला. किरकोळ शस्त्रक्रियेनंतर 12 तासांनंतर ते सेटवर परतले आहे. सर, तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात.”

 

View this post on Instagram

 

रोहित शेट्टीच्या अपघातानंतर शुटिंग थाबवण्यात आले होते आता मात्र, दिग्दर्शक ठिक असल्यामुळे वेब सिरिजची शुटिंग पुन्हा सुरु केली असून अभिनेत्याची तब्येत ठीक असल्याचेही दिग्दर्शकाने सांगितले आहे. इंडियन पुलिस फोर्सस या आगामी येणाऱ्या वेबसिरिजमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Obero) पाहायला मिळणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पॅपराजी फोटो काढायला येताच रिक्षाचालकावर भडकली ट्विंकल खन्ना, व्हिडिओत कैद झाली रिऍक्शन
गुरु रंधावसोबतची मस्ती शहनाझला पडली महागात, पळता पळता पडली धपकन अन्…

 

हे देखील वाचा