Wednesday, July 3, 2024

अरेरे! प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लीक झाला ‘सूर्यवंशी’; निर्मात्यांमध्ये काळजीचे वातावरण

अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट कोरोना महामारीमुळे मागील अनेक महिन्यांपासून प्रदर्शित केला नव्हता. परंतु या दिवाळीच्या मुहूर्तावर रोहित शेट्टीने प्रेक्षकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला आहे. ‘सूर्यवंशी’ चित्रपट शुक्रवारी (५ नोव्हेंबर) जवळपास ४००० स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. परंतु चित्रपट प्रदर्शित जरी झाला असेल, तर नुकतेच हा चित्रपट लीक होण्याची बातमी समोर आली आहे.

‘सूर्यवंशी’ हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिवर्समधील तिसरा चित्रपट आहे. कोरोना काळात अनेक निर्माते जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांचे चित्रपट प्रदर्शित करत होते. तेव्हा रोहित शेट्टीने ठरवले होते की, तो त्याचा चित्रपट फक्त चित्रपटगृहातच प्रदर्शित करणार. अशातच दिवाळी निमित्त प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. परंतु चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट अनेक वेबसाईटवर लीक झाल्याची माहिती आली आहे. (Rohit shetty’s Sooryavanshi film leaked by tamil rockers telegram)

ज्या वेबसाईटवर चित्रपट लीक झाला आहे. त्यामध्ये सगळ्यात टॉपची वेबसाईट तमिळ रॉकर्सचा समावेश आहे. तसेच टेलिग्रामवरील चॅनल आणि फिल्मी जिल्ला नावाच्या वेबसाईटवर लीक झाली आहे. या वेबसाईटवर तर एचडी चित्रपट डाऊनलोड करण्याचा पर्याय आहे.

चित्रपट लीक होण्याची बातमी आल्यानंतर आता चित्रपटाचे निर्माते काळजीत आहे. त्यांचे कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. हा चित्रपट बनवण्यासाठी २२५ कोटी रुपये एवढा खर्च आला आहे.

रोहित शेट्टीचा कॉप युनीवर्समध्ये या आधी ‘सिंघम’ आणि ‘सिंबा’ हे दोन चित्रपट झाले आहेत. ‘सूर्यवंशी’ यातील तिसरा चित्रपट आहे. चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ हे मुख्य भूमिकेत आहेत तर चित्रपटात अजय देवगण आणि रणवीर सिंग यांचे खास आकर्षण देखील असणार आहे. या चित्रपटात अक्षय आणि कॅटरिना जवळपास ११ वर्षानंतर एकत्र काम करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सूर्यवंशी’ चित्रपटात दिसणार महेंद्रसिंग धोनी? गुलशन ग्रोव्हर यांनी दिला इशारा

-अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ घालणार मोठ्या पडद्यावर धुमाकूळ! १०० टक्के क्षमतेने सुरू झाली चित्रपटगृहे

-Video: कॅटरिनाच्या ‘या’ प्रश्नावर अक्षय झाला लोटपोट, तर बिग बींनी दिले ‘असे’ एक्सप्रेशन्स

हे देखील वाचा