Friday, July 5, 2024

यंदाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ होणार आणखी खास, नवेकोरे रोमँटिक गाणे येणार प्रेमवीरांच्या भेटीला

फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. फेब्रुवारी चालू झाला की प्रत्येकाला वॅलेंनटाईन डेची आतुरता लागलेली असते. रोज डे, चॉकलेट डे, प्रपोज डे, असे अनेक डे प्रेमी जोडप्यांकडून साजरे केले जातात. म्हणूनच या महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात शेवटी वॅलेंनटाईन डे साजरा करून प्रत्येकजण आपल्या खास शैलीत आपले प्रेम व्यक्त करत असतो. आता त्यांचा हा डे स्पेशल करायला आणखी एक रोमँटिक हिंदी गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

गायक रोमिओ आणि काम्या चौधरी यांचे ‘तेरा दिवाना’ हे गाणे ‘वॅलेंनटाईन डे’च्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यातील अप्रतिम प्रेम कथा तुम्हाला प्रेमाच्या दुनियेत घेऊन जाते. प्रेमात काहीही करू शकणारा हीरो आणि त्याच्यासाठी वेडी असलेली त्याची प्रेयसी यांची सुंदर लवस्टोरी यामध्ये दाखविण्यात आली आहे. हे गाणे या वॅलेंनटाईन डे ला आणखीच स्पेशल करणार आहे.

गाण्याची सुरुवात एका अपघातापासून होते. ज्यामध्ये काम्या झोपेतून उठते आणि तिला कॉल येतो की रोमिओचा मृत्यू झाला आहे आता त्याला विसर. इथूनच या गाण्याला सुरुवात होते. गाण्यात प्रेमी जोडप्यांच्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक घटना मांडल्या आहेत. अत्यंत सुंदर आणि हृदयाला स्पर्श करतील असे या गाण्याचे बोल आहेत. त्यामुळेच हे गाणे प्रेम करणार्‍या प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला खास वाटत आहे. गाण्याच्या बोला इतकेच त्याचे लोकेशन आणि डान्स सुंदर वाटत आहे. या गाण्यातील प्रेमिका आपल्या जोडीदाराच्या प्रेमात आकंठ बुडालेली असते तिला जिथे तिथे तोच दिसत असतो अशी कथा यामध्ये दाखविण्यात आली आहे. रोमिओ आणि काम्याच्या या गाण्याने यंदा वॅलेंनटाईन डे खूपच खास होणार असल्याचे दिसत आहे.

हे देखील वाचा