Tuesday, April 8, 2025
Home बॉलीवूड अभिनेता रोनित रॉयने सांगितले टीव्हीवर काम न करण्याचे कारण; म्हणाला, ‘माझ्याकडून छोट्या पडद्यावर…’

अभिनेता रोनित रॉयने सांगितले टीव्हीवर काम न करण्याचे कारण; म्हणाला, ‘माझ्याकडून छोट्या पडद्यावर…’

अभिनेता रोनित रॉय हा मागील अनेक दिवसापासून टीव्ही शोमध्ये दिसला नाही. त्याने टेलिव्हिजनवर अनेक दिवस काम केले त्यानंतर त्याने ‘टू स्टेटस’ आणि ‘काबिल’ या चित्रपटात काम केले. तसेच ‘होस्टेजेस’ या वेबसीरिजमध्ये देखील त्याने काम केले आहे. मागील काही दिवसांपासून त्याने टेलिव्हिजनपासून ब्रेक घेतल्याचे दिसत आहे.

याबाबत त्याने सांगितले की, “माझ्याकडून छोट्या पडद्यावर काही खास होत नाहीये. कोरोनाच्या आधी टेलिव्हिजनवरून मला काही ऑफर आल्या होत्या, परंतु त्या काही मला भावल्या नाही. काही काळापूर्वी मी ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’ मध्ये काम केले होते, पण ती भूमिका काय होती आणि नंतर कुठे गेली. असे झाले कारण या मालिकेची भाषा काही वेगळीच होती.” (Ronit Roy explain he feels unsatisfied working on small screen)

याबाबत त्याने पुढे सांगितले की, “टेलिव्हिजनला त्यांच्या काही मर्यादा आहेत. त्यांना त्यांच्या मर्यादेत राहून काम करावे लागते. त्यामुळे एकसारखा कंटेंट येतो आणि स्टोरी रिपीट होतात. पुढे जाऊन हे सगळं खूप त्रासदायक होतं.” रोनितने या आधी ‘कसोटी जिंदगी की’ मध्ये ऋषभ बजाज आणि ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मध्ये मिहीर विरानीची भूमिका निभावली आहे.

रोनितने पुढे सांगितले की, “मी काही टीव्ही प्रोजेक्टबद्दल बातचीत करत आहे, परंतु समस्या अशी आहे की, जर मला काही उत्साह नसेल, तर मला घराच्या बाहेर जायला आवडत नाही. त्याच्या मते पात्रात काहीतरी वेगळेपण असावे, जेणेकरून कामावर जाण्याचे मन होईल. चांगल्या कामाची नेहमी भूक असावी. आपण केलेल्या कामाचे प्रेक्षकांनी कौतुक करावे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे.”

त्याने ओटीटीवर देखील चांगले काम केले आहे. त्यात ‘हम सफर है’, ‘होस्टेजेस’, ‘सात कदम’ आणि ‘कॅंडी’ यांसारख्या वेबसीरिजचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरच्या मनमोहक फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष, एक नजर टाकाच

-‘बिग बॉस’च्या घरामध्ये लग्न करण्यासाठी सारा खान अन् अली मर्चंटला मिळाले होते लाखो रुपये?

-पिझ्झा खाणारी ‘ही’ विचित्र महिला आहे बॉलिवूडची अभिनेत्री, नाव जाणून तुम्हीही व्हाल अचंबित

हे देखील वाचा