Saturday, June 29, 2024

“…एकदा गमावल्यानंतर पुन्हा…” रोनित रॉयने शेअर केलेल्या ‘त्या’ पोस्टवर स्मृती इराणींनी कमेंट करत विचारले…

बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता असलेल्या रोनित रॉयने त्याच्या प्रभावी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तो नेहमीच त्याच्या विविध प्रोजेक्टमुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा रोनित चर्चेत आला आहे. मात्र यावेळेस तो त्याच्या प्रोजेक्टमुळे नाही तर त्याच्या एका पोस्टमुळे गाजत आहे.

रोनित रॉयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये लिहिले आहे की, “भाऊ आणि ब्रो हे शब्द त्यांचा अर्थ पूर्णपणे विसरले आहेत. जेव्हा कोणी मला या शब्दांनी बोलवतात तेव्हा मी ते खूपच गंभीर घेतो, आणि नंतर माझ्यासोबत असे काही घडते जे मी माझ्या शत्रूसोबत देखील करू शकणार नाही. यामुळे नक्कीच त्रास होतो, मात्र हे नक्कीच समजते की, त्यांची पातळी किती खाली जात आहे. माझी नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ronit Boseroy (@ronitboseroy)

ही पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “पैसा, पत गमावलेल्या सर्व गोष्टी पुन्हा मिळवल्या जाऊ शकतात. मात्र वेळ, प्रेम, सन्मान आणि नाते एकदा गमावल्यानंतर पुन्हा मिळत नाही. जर तुम्हाला खरे होण्याची गरज आहे, तर नक्कल का बनून राहतात.”

रोनितच्या या पोस्टवर त्याच्या फॅन्ससोबतच कलाकार देखील कमेंट्स करत आहे. अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांनी देखील कमेंट करत त्याला विचारले, “काय झाले?” तर अभिनेत्री रुपाली गांगुलीने कमेंट करत म्हटले की, “मी तुमचा त्रास समजू शकते”. तर काही फॅन्सने त्याला ‘नक्की काय झाले? तुम्हाला काही विचित्र अनुभव आला का?’ असे अनेक प्रश्न विचारले आहे.

रोनित रॉयबद्दल सांगायचे झाल्यास त्याने एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तो एकता कपूरचा आवडता अभिनेता म्हणून देखील ओळखला जातो. याशिवाय तो ‘अदालत’मध्ये देखील झळकला होता. रोनित चित्रपटांमध्ये देखील काम करतो. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, नुकताच तो ‘गुमराह’मध्ये दिसला होता. आगामी काळात तो शाहिदच्या ‘ब्लडी डॅडी’मध्ये दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! यश चोप्रा यांच्या पत्नी आणि जेष्ठ गायिका पामेला चोप्रा यांचे निधन

बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसवर आणि निर्मात्यांच्या घरी इनकम टॅक्स विभागाची छापेमारी

हे देखील वाचा