Saturday, August 2, 2025
Home अन्य दु:खद! सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सचा कार अपघात, अवघ्या 25 व्या वयातच घेताला अखेरचा श्वास

दु:खद! सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सचा कार अपघात, अवघ्या 25 व्या वयातच घेताला अखेरचा श्वास

सोशल मीडियावरील सतत काही नवनवीन व्हिडिओ व्हायर होत असतात. अशातच काही व्हिडिओ एवढे व्हायरल होतात की, तो व्यक्ती खूप प्रसिद्ध होतो आणि त्याचा मोठा चाहाता वर्ग बनतो. अशापैकीच सोशल मीडियावरुन प्रसिद्धी झोतात आलेला इन्फ्लूएन्सर्स राऊडी भाटी याचा एका भीषण अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी राऊडीचे निधन झाले.

 

सोशल मीडिया स्टार राऊडी भाटी (Rawdy Bhati) याचा कार अपघातात मृत्यु झाला आहे. त्याची कार भरधाव वेगाने झाडावर आदळल्याने हा अपघात घडला अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याकडून मिळाली आहे. राऊडी नवाने प्रसिद्ध असणाऱ्या सोशल मीडिया स्टारचे पूर्ण नाव राऊडी भाटी असे आहे. त्याचा नुकताच कार अपघातात मृत्यू झाला आहे, त्यामध्ये त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र देखिल होते. या अपघातामध्ये त्याचे दोन्ही मित्र गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना नोएडा आणि दिल्ली येथे रुग्णालयात दाखल केले आहे. राऊडीच्या मृत्युमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

ही बातमी सतत अपडेट आहे

हे देखील वाचा