Tuesday, February 3, 2026
Home कॅलेंडर दुःखद! बहुप्रतिभावान हॉलिवूड अभिनेत्री जेन पॉवल यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दुःखद! बहुप्रतिभावान हॉलिवूड अभिनेत्री जेन पॉवल यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

या भूतलावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस या सृष्टीची रजा घ्यायचीच आहे. अशात काही व्यक्ती जन्मलेल्या भूमीसाठी तेथील नागरिकांसाठी काहीतरी खास करून जातात. वेगवगेळ्या क्षेत्रांमध्ये नाव कमवून कायमस्वरूपी सध्याच्या आणि भावी पिढीच्या मनात अजरामर होतात. त्यातीलच एक अभिनेत्री जेन पॉवल.

हॉलिवूड अभिनेत्री जेन पॉवल यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये हॉलिवूड चांगलेच गाजवले होते. गुरुवारी (१६ सप्टेंबर) त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. वयाच्या मानाने त्यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेल्या माहिती नुसार, त्यांचे नैसर्गिक पद्धतीनेच निधन झाले आहे. जेन यांनी ४० ते ५० च्या दशकामध्ये आपल्या अभिनयाने आणि डान्सने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या चित्रपटांमधील अभिनय इतका दमदार होता की, अनेक व्यक्ती आजही त्यांचे चित्रपट आवडीने पाहतात. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सुजन ग्रैंजर यांनी जेन यांच्या मृत्यूविषयी बोलताना सांगितले की, जेन यांनी विल्‍टनमध्ये शेवटचे श्वास घेतला. (Royal wedding famous Hollywood actress Jane Powell passes away at the age of 92)

या दोन चित्रपटांमधून गाठले होते यशाचे शिखर
जेन यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठं मोठ्या कलाकारांबरोबर काम केले होते. यामध्ये ‘रॉयल वेडिंग’ आणि ‘सेवन ब्राइड्स फॉर सेवन ब्रदर्स’ या दोन चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयातील कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात साल १९४४ मध्ये ‘सॉंग ऑफ द ओपन रोड’ या चित्रपटामधून केली. तसेच अभिनयातील साल २००३ मध्ये आलेला ‘ब्रॉडवे : द गोल्डन एज, बाय द लिजेंड्स हू व्हेअर देअर’ हा त्यांच्या कारकिर्दीमधील शेवटचा माहितीपट होता. साल १९५१ मध्ये ‘रॉयल वेडिंग’ या चित्रपटामधून त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. यामध्ये त्यांनी फ्रेड एस्‍टेयर यांच्यासह जबरदस्त डान्स केला होता.

उत्तम डान्सर आणि स्टेज परफॉर्मर देखील होत्या जेन
जेन यांनी तत्कालीन राष्ट्रपती हैरी एस. ट्रूमैन यांच्या एका उद्घाटन समारंभामध्ये देखील आपली कला सादर कले होती. एवढंच नाही, तर त्यांनी एलिजाबेथ टेलर यांच्या लग्नामध्ये ब्राइड्समेड बनण्याची संधी देखील मिळवली होती. त्या आपल्या अभिनयासह स्टेज परफॉर्मर म्हणून देखील ओळखल्या जात होत्या. जेन यांनी हिट रोड प्रस्तुत ‘द साउंड ऑफ म्यूजिक’, ‘ओक्लाहोमा!’, ‘माय फेयर लेडी अँड कैरॉसल’ या संगीत चित्रपटांमध्ये देखील कमालीची कामगिरी बजावली होती.

५ वेळा केला होता विवाह
हॉलिवूड मधील ४० ते ५० च्या दशकातील काही निवडक कलाकारांनीच २१ वे शतक पहिले आहे. त्यातीलच एक जेन होत्या. साल १९४९ मध्ये त्यांनी ग्रेअरी स्टेफन यांच्याशी विवाह केला त्यानंतर १९५३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. पॅट्रिक नरने यांच्या बरोबर साल १९५४ ते १९६३ पर्यंत, तर जेम्स फिट्जग्लेअर्ड यांच्या बरोबर साल १९६५ ते १९७५ आणि डेव्हिड पार्लर बरोबर साल १९७८ ते १९८१ पर्यंत तसेच डिकिय मोर यांच्या बरोबर साल १९८८ ते २०१५ पर्यंत विवाहिक आयुष्य जगल्या. त्यांच्या पश्चात त्यांचे दोन पती आणि तीन मुलं आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

हे देखील वाचा