दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावजेलेले दिग्दर्शक एसएस राजामौली यांची बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता काहीच वेळ शिल्लक आहे. चाहते मागील बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी देखील या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी एक छोटासा प्रोमो प्रदर्शित केला होता. सोशल मीडियावर हा प्रोमो व्हायरल होत होता. यामध्ये राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि आलिया भट्ट डान्स करताना दिसत आहेत.
‘आरआरआर’ या चित्रपटाच्या प्रोमोमध्ये आपण पाहून शकतो की, ज्युनियर एनटीआर आणि रामचरण ‘वंदे मातरम्’ असे लिहिलेल्या एका झेंड्याला लावत आहेत. तसेच आलिया भट्ट गुलाबी आणि लाल रंगाच्या एका आऊट फिटमध्ये दिसत आहे. तसेच राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर कुर्ता आणि पायजमामध्ये दिसत आहे. तिघेही जोशात ढोल नगाडे यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहेत. त्या तिघांना आता चित्रपट एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. (RRR movies promo viral on social media)
‘आरआरआर’ हा एक मेगा बजेट चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर होणारी कमाई यासाठी खूप महत्वाची असणार आहे. कोरोनामुळे मागील अनेक दिवसापासून चित्रपट प्रदर्शित केला नव्हता. परंतु आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने हा चित्रपट येत्या २५ मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
‘आरआरआर’ या चित्रपटाची कहाणी १९२० च्या काळातील आहे. चित्रपटात क्रांतिकारी अल्लुरी आणि कोमाराम यांची कहाणी दाखवली आहे. जे ब्रिटिश राज आणि हैद्राबाद निजाम यांच्या विरोधातील लढाई आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्टसोबत अजय देवगण देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.
हेही वाचा :