Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड ऑस्कर २०२३ रोष : ऑस्कर जिंकल्यानंतर व्यक्त होऊ दिले नाही, तर नाटू-नाटू गाण्याचा लेखकाला बोलण्यासाठी दिला एक सेकंड

ऑस्कर २०२३ रोष : ऑस्कर जिंकल्यानंतर व्यक्त होऊ दिले नाही, तर नाटू-नाटू गाण्याचा लेखकाला बोलण्यासाठी दिला एक सेकंड

ऑस्कर २०२३ मध्ये भारतीय सिनेमा असलेल्या ‘आरआरआर’ आणि ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ या सिनेमांनी बाजी मारली आणि पुरस्कार पटकावला. मात्र या पुरस्कारादरम्यान एक वाद देखील पाहायला मिळाला.

‘द एलिफेंट व्हिस्परर्स ‘ चित्रपटाची निर्माती असणाऱ्या गुनीत मोंगा यांना पुरस्कार मिळाल्यानंतर बोलू दिले गेले नाही. यावर त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. आता नाटू-नाटू गाण्याचे लेखक असणाऱ्या चंद्रबोस यांच्याबद्दल देखील अशीच काहीशी माहिती मिळत असली तरी त्यांना त्या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांवर कोणतीच नाराजी नसल्यचे म्हटले आहे.

आरआरआर सिनेमातील नाटू-नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या विभागात पुरस्कार मिळाला. त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर जेव्हा किरवानी आणि चंद्रबॉस स्टेजवर गेले तेव्हा किरवानी यांना केवळ ४५ सेकंड बोलण्यासाठी दिले गेले होते. तर चंद्रबोस यांना एकही सेकंड दिला गेला नाही, त्यांनी फक्त नमस्ते म्हटले. मात्र तरीही त्यांना काहीच समस्या नाही, कारण तो एक सेकंद देखील इतिहास घडवण्यासाठी पुरेसा होता.

चंद्रबोस यांनी सांगितले की, “किरवानी सरांना बोलण्यासाठी ४५ सेकंड दिले गेले होते. मात्र ते ३० सेकंड बोलले आणि लगेच म्युझिक चालू झाले. त्यांनतर मला बोलूच दिले नाही. मला वाटते ऑस्कर जिंकणेंच खूप महत्वाचे आहे. ऑस्कर हा शब्दच माझ्यासाठी ताकद आणि खजाना आहे. मला एक सेकंड दिला आणि मी नमस्ते बोलले हेच खूप आहे. मी नेहमी महतो की, इतिहास रचण्यासाठी एक तास नाही तर एक सेकंद देखील पुरेसा आहे.”

दरम्यान ऑस्कर २०२३ मध्ये नाटू-नाटू गाण्याने अनेक पुरस्कार मिळवले आहे. यात गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि क्रिटिक्स च्वाइस अवॉर्ड आदींचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
परिणीती चोप्राने राघव चढ्ढासोबत लग्नाच्या बातमीवर अखेर साेडले माैन; म्हणाली, ‘माझं वैयक्तिक आयुष्य…’

गॉर्जियस शेहनाज गिलचे स्टनिंग फोटोशूट व्हायरल, एकदा पाहाच

हे देखील वाचा