Tuesday, July 9, 2024

‘बिग बॉस १४’ची विजेती रुबीना दिलैकचे पहिले गाणे प्रदर्शित, एकाच दिवसात मिळाले १४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

‘बिग बॉस 14’ ची विजेती आणि प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक ही नेहमीच सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनते. वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक आयुष्याबद्दल नेहमीच तिच्याबद्दल चर्चा चाललेल्या असतात. रुबीनाचे नुकतेच एक नवीन गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात ती ‘बिग बॉस 13’ फेम पारस छाब्रा याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसत आहे. या दोघांचे ‘गलत’ हे गाणे सर्वत्र प्रदर्शित झाले आहे. पारस आणि रुबीनाचे हे पहिले गाणे आहे. ज्यात त्यांनी रोमान्स केला आहे. एवढंच नाही, तर शेवटी त्यांच्या प्रेमातील धोका देखील दाखवला आहे.

या गाण्यात दाखवले आहे की, पारस हा रुबीनाची प्रॉपर्टी बघून तिच्याशी लग्न करतो. रुबीना मात्र त्याच्यावर जीवापाड प्रेम करताना दाखवली आहे. पण नंतर पारस तिच्याकडून तिच्या सगळ्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेतो. पण रुबीनाला त्याच्यावर संशय येतो आणि शेवटी ती त्याचा प्लॅन ओळखते. त्याच्या या धोक्यात ती दारू पिताना देखील दाखवली आहे. जेव्हा तिला सत्य समजते, तेव्हा ती प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स फाडून टाकते पण तो तिच्यावर बंदूक उगारतो. पण नंतर लगेच तिथे रुबीनाचे वडील आलेले दाखवले आहे. पारस तिच्या वडिलांना मारायचा प्रयत्न करतो. तेवढ्यात रुबीना पडलेली बंदूक घेऊन पारसवर निशाणा साधते.

हे गाणे अत्यंत भावनिक ट्रॅकमध्ये गायले आहे. असीस कौर हिने हे गाणे गायले आहे आणि विकास याने हे गाने कंपोज केले आहे. हे गाणे यूट्यूबवर खूप पसंत केले जात आहे. या गाण्याला एक दिवसातच १४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

पारस आणि रुबीना हे दोघेही बिग बॉसमधील लोकप्रिय असलेले स्पर्धक आहेत. याआधी रुबीनाचे ‘मरजानिया’ हे गाणे रिलीझ झाले होते. या गाण्यात ती तिचा पती अभिनव शुक्ला याच्यासोबत दिसत आहे. रुबीना लवकरच कलर्सवरील ‘शक्ती’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचे प्रोमो देखील रिलीझ झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जोडप्याच्या ‘बारिश की जाए’ गाण्यावरील डान्सने जिंकले सर्वांचे मन, गायक बी प्राकने शेअर केला जबराट व्हिडिओ

-नाचा रे! वडील कमल हासन यांच्या निवडणूक प्रचारासाठी अभिनेत्रीने लावले ढोल- ताशावर ठुमके, पाहा जबरदस्त डान्स व्हिडिओ

-‘मूर्खपणा शिगेला पोहोचला आहे’, मास्क न लावल्यामुळे टीव्ही कलाकारांनी सुनावले कंगना रणौतला खडेबोल

हे देखील वाचा