Thursday, December 4, 2025
Home टेलिव्हिजन लक्ष्मी आली! रुबिना दिलैकने दिला जुळ्या मुलींना जन्म? सोशल मीडियावर ‘ती’ पोस्ट तुफान व्हायरल

लक्ष्मी आली! रुबिना दिलैकने दिला जुळ्या मुलींना जन्म? सोशल मीडियावर ‘ती’ पोस्ट तुफान व्हायरल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैकने (Rubina Dilaik) तिच्या अभिनयच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. आता पुन्हा एकदा रुबिना दिलैक चर्चेत आली आहे. रुबिना दिलैकने जुळ्या मुलींना जन्म दिला असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. रुबिनाच्या ट्रेनरने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली होती. पण काही वेळानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. मात्र, रुबिनाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

रुबिनाच्या ट्रेनरने रुबिनाबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्राम (Rubina Dilaik gave birth to two daughters) स्टोरीवर शेअर केला होता. हा फोटो शेअर करीत तिने ‘दोन जुळ्या मुलींसाठी रुबिना तुझं अभिनंदन’ अशी कॅप्शनही दिली होती. मात्र, काही वेळानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी रुबिनाचे अभिनंदन केले आहे. तर काही चाहत्यांनी ही आनंदाची बातमी लपवून ठेवल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.

रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) हे दोघेही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार आहेत. रुबिनाने ‘छोटी बहू’, ‘शक्ती’ आणि ‘बिग बॉस’ यासारख्या लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. अभिनव शुक्लाने ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होऊन लोकप्रियता मिळवली होती. रुबिना आणि अभिनव या दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यातही खूप आनंदी आहेत.

रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्लाने 2018मध्ये लग्न केले होते. आता त्यांना जुळ्या मुलींचा जन्म झाला असल्याने त्यांची कुटुंबाची आनंदाची उंची शिखरावर पोहोचली आहे. या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे रुबिनाच्या चाहत्यांना आनंद झाला. त्यांनी रुबिनाचे अभिनंदन केले. मात्र, या बातमीची अधिकृत घोषणा रुबिना आणि अभिनव शुक्ला यांनी केली नाही. (Rubina Dilaik gave birth to twin girls The post of the actress trainer is in discussion)

आधिक वाचा-
अमिताभ बच्चन यांना नातीचा अभिमान; पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘मला गर्व आहे…’
जेव्हा अनोळखी लग्नात जाऊन साराने केला होता काकांसोबत डान्स, अनन्या पांडेने केला खुलासा

हे देखील वाचा