Friday, July 5, 2024

KKK 12 | अरे देवा! उंदराला किस केल्यानंतर बिघडली रुबिना दिलैकची प्रकृती

टेलिव्हिजन रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी सीझन १२’मध्ये सध्या स्पर्धकांवर होणारे अत्याचार वाढतच आहेत. काही स्पर्धक या स्टंटवर आधारित शोमधून बाहेर पडले आणि काही अजूनही यातील धोक्यांचा सामना करत आहेत. नुकताच शोचा एक नवीन प्रोमो रिलीझ झाला आहे, ज्यामध्ये रुबिना दिलैक (Rubina Dilaik) उंदराला किस करताना दिसत आहे.  

कलर्स टीव्हीच्या इंस्टाग्राम हँडलवर हा प्रोमो व्हिडिओ रिलीझ करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री रुबिना दिलैक निशांत भट्टसोबत (Nishant Bhatt) टास्क करताना दिसत आहे. यात रुबिना निशांतच्या तोंडाला प्लास्टिकचा डबा धरून उभी आहे. तेव्हाच या पेटीत उंदीर सोडला जातो. रुबिना डोळे मिटून उंदराला किस करते. रुबिना जेव्हा उंदराला किस करते, तेव्हा बाकीचे स्पर्धक हसताना दिसतात. (rubina dilaik kissed mouse in new promo video)

याआधी रुबिनावर ‘खतरों के खिलाडी’ शोमध्ये प्राण्यांशी संबंधित बरेच अत्याचार झाले आहेत. होस्ट रोहित शेट्टीने (Rohit Shetty) तिच्यासोबत अनेकदा प्रँक केले आहेत. रुबिनाला इगुआनापासून ते अजगर साप, बेडूकपर्यंत किस घेण्यास सांगितले गेले आहे आणि अभिनेत्रीने हे मजेदार कार्य प्रत्येक वेळी घाबरून चांगल्या प्रकारे हाताळले आहे.

एका एपिसोडमध्ये रुबिना तिच्या तोंडात किडे आणि खेकडे भरून डब्यात फेकताना दिसली होती. रुबिनाची अवस्था पाहून रोहित शेट्टी खूप हसला. बाकी स्पर्धकही रुबिनाला पाहून खूप हसले. शोमध्ये रुबीनाने अनेक मजेशीर गोष्टी करून शोमधील मनोरंजन कायम राखले आहे.

‘खतरों के खिलाडी’चा हा प्रोमो व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते मजेशीर कमेंट करत आहेत. बॉस लेडीची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. रुबिना या शोची विजेती ठरेल, असा बहुतेकांचा विश्वास आहे. दरम्यान स्पर्धक शिवांगी जोशीलाही शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मात्र, ‘खतरों के खिलाडी सीझन १२’ची ट्रॉफी कोण घेते ते पाहणे रंजक ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा