Monday, July 1, 2024

रुबीना दिलैक पतीसोबत करतेय सुट्ट्या एन्जॉय; फोटोमध्ये पाहायला मिळतोय कपलचा ‘डॅशिंग’ अंदाज

‘बिग बॉस १४’ ची विजेती स्पर्धक आणि टेलिव्हिजन अभिनेत्री म्हणजे रुबीना दिलैक होय. रुबीना ही प्रेक्षकांच्या आवडीची अभिनेत्री आहे. ‘बिग बॉस’नंतर ती खूप चर्चेत आली आहे. तिने या शोमध्ये खूप मस्ती, मनोरंजन केले आहे. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती अभुनाव शुक्ला देखील होता. त्यांचा रोमान्स देखील सगळ्या प्रेक्षकांनी पाहिला आहे. ऑनस्क्रीन जेवढे ते रोमँटिक आहेत, तेवढात रोमान्स ऑफस्क्रीन त्यांच्यातील पाहायला मिळतो. अशातच त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रुबीनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती तिच्या पती सोबत दिसत आहे. ते दोघेही बीचवर दिसत आहे. रुबीनाने आकाशी रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच तिने डोळ्यांवर चष्मा लावला आहे. तसेच एक मल्टी कलरची पर्स घेतली आहे, तर अभिनवने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे तसेच डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातली आहे. काळ्या रंगाचा चष्मा घातला आहे. या फोटोंमध्ये त्यांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. तसेच त्यांचे चाहते या फोटोंवर कमेंट करत आहेत. (rubina dilaik share a photos on social media with her husbund)

रुबीनाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘छोटी बहू’, ‘शक्ती : अस्तित्व के एहसास की’, ‘सास बिना ससुराल’, ‘इश्क में मरजावा’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच याआधी रुबीनाचे ‘मरजानीया’ आणि ‘गलत’ हे गाणे रिलीझ झाले होते. मरजानिया गाण्यात ती तिचा पती अभिनव शुक्लासोबत दिसत आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावरून माहिती दिली होती की, अभिनव शुक्ला आणि ती लवकरच एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तिने या गाण्याचा पोस्टर शेअर करून ही माहिती दिली होती. यामध्ये ते दोघेही ग्रामीण लूकमध्ये दिसत होते. त्यांच्या या गाण्याचे नाव ‘तुमसे प्यार है’ हे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘या’ पाच मालिका सज्ज; लवकरच झी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री

-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन

हे देखील वाचा