Wednesday, August 6, 2025
Home अन्य रुबीनाने शेअर केला आगामी म्युझिक व्हिडिओचा पोस्टर; पुन्हा पाहायला मिळणार अभिनव- रुबीनाची रोमॅंटिक केमिस्ट्री

रुबीनाने शेअर केला आगामी म्युझिक व्हिडिओचा पोस्टर; पुन्हा पाहायला मिळणार अभिनव- रुबीनाची रोमॅंटिक केमिस्ट्री

‘बिग बॉस १४’ची विजेती स्पर्धक आणि अभिनेत्री रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. बिग बॉसच्या घरात तिचा हटके अंदाज, टास्क खेळण्याची पद्धत आणि लोकप्रियता त्यामुळे तिने हा शो जिंकला आहे. आधीपासून मालिकांमधून घराघरात पोहचलेल्या रुबीनाला बिग बॉसमध्ये खूप पसंती मिळाली. तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम आणि सपोर्ट मिळाला होता. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती अभिनव शुक्ला देखील होता. त्यामुळे त्यांच्यातील प्रेम सर्वांनी पाहिले आहे. या शोनंतर रुबीना खूप चर्चेत आली होती. तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये देखील कमालीची वाढ झाली आहे. ती तिच्या चाहत्यांसाठी रोज नवनवीन फोटो पोस्ट करत असते. अशातच रुबीनाने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

रुबीनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या आगामी म्युझिक व्हिडिओचा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये तिच्यासोबत तिचा पती अभिनव शुक्ला दिसत आहे. तसेच गायक विशाल मिश्रा देखील दिसत आहे. या पोस्टरमध्ये रुबीना आणि अभिनव या दोघांचाही ग्रामीण भागातील लूक दिसत आहे. हा पोस्टर शेअर करून तिने लिहिले आहे की, “तुमसे प्यार है. आमच्या आगामी रोमँटिक ट्रॅकचा पोस्टर. विशाल मिश्रा याच्या आवाजात. चला तर पाहुयात तुम्ही या गाण्याची रिलीझ डेट गेस करू शकता का?” (Rubina dilaik share her upcoming music video’s poster on social media)

या गाण्याचा लेखक, गायक आणि कंपोजर विशाल मिश्रा आहे. या गाण्यात रुबीना आणि अभिनवची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तिचे अनेक चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. अनेकांना हा पोस्टर खूपच आवडला आहे. तसेच अनेकजण हे गाणे ऑगस्ट महिन्यात रुबीनाच्या वाढदिवशी प्रदर्शित होईल असा अंदाज लावत आहेत. https://www.instagram.com/p/CR8_Yg3IUZA/?utm_medium=copy_link

रुबीनाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘छोटी बहू’, ‘शक्ती : आस्तित्व के एहसास की’, ‘सास बिना ससुराल’, ‘इश्क में मरजावा’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच याआधी रुबीनाचे ‘मरजानीया’ आणि ‘गलत’ हे गाणे रिलीझ झाले होते. मरजानिया गाण्यात ती तिचा पती अभिनव शुक्लासोबत दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा