Monday, June 9, 2025
Home अन्य Oops | हवेत उडत राहिला स्कर्ट, पण कामात मग्न राहिली रुबीना दिलैक; समोर आला ‘असा’ फोटो

Oops | हवेत उडत राहिला स्कर्ट, पण कामात मग्न राहिली रुबीना दिलैक; समोर आला ‘असा’ फोटो

छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik) अनेक वर्षांपासून या इंडस्ट्रीचा एक भाग आहे. रुबीनाच्या सौंदर्यामुळे तिची फॅन फॉलोविंग खूप मोठी आहे. अशा परिस्थितीत, अभिनेत्री तिच्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर तिचे फोटो अपडेट करण्यास विसरत नाही. अशातच, आता पुन्हा एकदा रुबीनाने इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, जे काही तासांतच प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

लेटेस्ट फोटो व्हायरल
या लेटेस्ट फोटोंमध्ये, रुबीना गुलाबी पोल्का डॉट स्कर्ट आणि जांभळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये अगदी बार्बी डॉलसारखी दिसत आहे. यात अभिनेत्रीने मोकळे केस, हील्स आणि जड इअरिंगसह तिचा दिलखेचक लूक पूर्ण केला आहे. मात्र यादरम्यान रुबीनाचा स्कर्ट हवेत उडताना दिसत आहे. पण ती पोझ देण्यात मग्न दिसत आहे. (rubina dilaik skirt goes in air amid photoshoot actress keep posing for the camera in polka dot skirt)

 

‘शक्ती’ या मालिकेमधून प्रसिद्ध झालेल्या रुबीनाला ‘बिग बॉस १४’चा भाग झाल्यानंतर घरोघरी विशेष ओळख मिळाली. अर्थात तिच्या मालिकेमध्ये ती एका सुसंस्कृत सुनेच्या अवतारात दिसत असली, तरी खऱ्या आयुष्यात रुबीनाने आपल्या बोल्डनेसने सर्वांनाच थक्क केले आहे. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

बोल्ड स्टाईलसाठी आहे प्रसिद्ध
रुबीना दिलैक पती अभिनव शुक्लासोबत देखील तिचे एकापेक्षा एक रोमँटिक फोटो शेअर करत असते. रुबीनाला सुट्ट्या घालवण्याचा खूप छंद आहे. व्हेकेशनमध्ये ती सतत तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अनेक पोस्टमध्ये तिची बोल्ड स्टाइल पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

‘बिग बॉस १४’ची विजेती आहे रुबीना दिलैक
विशेष म्हणजे, रुबीना गेल्या वर्षी ‘बिग बॉस १४’ ची विजेती बनली होती. तेव्हापासून तिच्या चाहत्यांची यादी मोठी झाली आहे. त्याचबरोबर तिला अनेक नवीन प्रोजेक्ट्सही मिळू लागले आहेत. टीव्ही शो व्यतिरिक्त ती काही म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.

 

हे देखील वाचा