Monday, February 24, 2025
Home मराठी मराठमोळं लूक अन् इंग्लिश ठुमके! रुचिरा जाधवने नऊवारी साडीमध्ये स्वीकारलं ‘हे’ चॅलेंज

मराठमोळं लूक अन् इंग्लिश ठुमके! रुचिरा जाधवने नऊवारी साडीमध्ये स्वीकारलं ‘हे’ चॅलेंज

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेमध्ये काम करून, अभिनेत्री रुचिरा जाधवने बरीच वाहवा मिळवली. यात तिचे पात्र छोटे असले तरीही ते चांगलेच प्रसिद्ध झाले होते. रुचिरा जाधव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इतकेच नव्हे, तर तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर बऱ्याचदा व्हायरल देखील होतात. चाहतेही तिच्या पोस्ट्सला भरभरून प्रेम देत असतात. नुकतेच रुचिराने डान्सचं चॅलेंज स्वीकारलं, तेही नऊवारी साडीमध्ये. हे पाहून नेटकरीही तिचं कौतुक करत आहेत.

रुचिरा जाधवने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात अभिनेत्रीचा मराठमोळा लूक पाहायला मिळाला आहे. यात रुचिराने लाल रंगाची नऊवारी साडी नेसली आहे आणि पारंपारिक लूक केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने बेंड ओव्हर हे डान्स चॅलेंज स्वीकारलं आहे. इंग्रजी गाण्यावर रुचिराचे ठुमके तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहेत. (ruchira jadhav doing bend over in nauwari saree)

रुचिराने ही पोस्ट शेअर करताच, ती व्हायरल व्हायला सुरुवात झाली होती. मराठमोळं लूक आणि त्यावर इंग्रजी ठुमके असल्यामुळे, हा व्हिडिओ भलताच चर्चेत आला आहे. व्हिडिओ शेअर करत रुचिरा म्हणतेय, “नऊवारी साडीमध्ये बेंड ओव्हर कसं वाटलं?” या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. यावर २५ हजाराहून अधिक लाईक्स आले आहे.

रुचिकाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत झळकली होती. यात तिने मायाची भूमिका साकारली होती, जिचे खूप कौतुक करण्यात आले होते. तिने ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते. ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘प्रेम हे’ यासारख्या अनेक मालिकांमध्येही रुचिका दिसली आहे. शिवाय तिने ‘लव लफडे’, ‘सोबत’ या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त

हे देखील वाचा