‘बिग बॉस मराठी‘चे तिसरे पर्व नुकतेच संपले आहे. तब्बल दोन वर्ष प्रेक्षकांनी या पर्वाची वाट बघितली आहे. अखेर सप्टेंबर महिन्यात तिसरे पर्व सुरू झाले. अनलॉक एंटरटेनमेंट म्हणत या शोची सुरुवात झाली आणि सगळ्याच प्रेक्षकांना खूप आनंद झाला. नुकताच १०० दिवसाचा प्रवास पूर्ण होऊन ग्रँड फिनाले झाला आहे. विशाल निकम हा या पर्वाचा विजेता झाला आहे. तसेच जय दुधाने हा उपविजेता झाला आहे. दोघेही सुरुवातीपासून खूप लोकप्रिय स्पर्धक होते. त्यांनी त्यांच्या या खिलाडू वृत्तीने बिग बॉसच्या घरात खास स्थान निर्माण केले. तसेच त्यांचा चाहतावर्ग भरपूर असल्याने ते दोघे भरघोष मतं मिळवून टॉप २ मध्ये जागा मिळवली. जयने बिग बॉसची ट्रॉफी मिळवली नसली, तरी देखील त्याने त्याचा खूप मोठा चाहता वर्ग तयार केला आहे.
या सगळा प्रवास करून जय नुकताच त्याच्या घरी पोहचला आहे. अशातच त्याने त्याच्या चाहत्यांचे आभार मानत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या चाहत्यांचे आभार मानतो आणि तो १०० दिवस घरात केवळ त्याच्या चाहत्यांमुळे राहू शकला असे देखील म्हणतो. तसेच सोशल मीडियावर त्याला जो काही पाठिंबा दिला त्याबद्दल तो आभार मानतो. तसेच तो म्हणतो की, त्याने जरी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली नसली, तरी देखील त्याने लाखो माणसे जोडली आहेत आणि तिचं माणसं त्याच्यासाठी खूप महत्वाची आहेत. (runner up winner of bigg boss marathi 3 jay dudhane give thanks to his fans)
त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहे. बिग बॉसच्या घरात असताना जयने त्याच्यातील प्रत्येक कला दाखवली आहे. त्यामुळे अनेकांना तो खूप आवडत होता. ग्रँड फिनालेमध्ये महेश मांजरेकरांनी त्याला एक चित्रपट देखील ऑफर केला आहे. जय आता आपल्याला महेश मांजरेकर यांच्या ‘शनिवारवाडा’ या चित्रपटात दिसणार आहे. जय जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या चाहत्यांनी ढोल ताशाच्या गजरात त्याचे स्वागत केले.
हेही वाचा :
सोनाली पाटीलने केला ‘बुरुम बुरुम’ ट्रेंड फॉलो, कॅप्शनने वेधले चाहत्यांचे लक्ष
‘या’ बॉलिवूड कलाकारांसाठी २०२१ ठरले वाईट वर्ष, नामांकित अभिनेत्रीचाही आहे समावेश
‘हा’ माणूस नसता तर सलमान सुपरस्टार झाला नसता, जाणून घ्या सलमानला ‘प्रेम’ नाव देणाऱ्या दिग्गजाबद्दल