‘आई कुठे काय करते’ ही टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चर्चेत असणारी मालिका आहे. अनके मालिकांना मागे सारून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. मालिकेची कहाणी काही वेगळी आणि प्रेक्षकांना भावणारी आहे. मुख्य गोष्ट म्हणजे लेखकाने मालिकेतील प्रत्येक पात्र उत्कृष्टरित्या रेखाटले आहे. मालिकेत रुपाली भोसले ही नकारात्मक भूमिकेत आहे, तरी देखील तिला सोशल मीडियावर नेहमीच प्रेम मिळत असतं. तसेच मधुराणी गोखले ही मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. तिच्या शांत आणि समंजस पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. मालिकेत जरी त्या एकमेकांच्या सवती असल्या तरी देखील वैयक्तिक आयुष्यात मात्र त्या दोघी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहे. अशातच त्या दोघींचा एक गोड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, त्या दोघीही अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. फोटोमध्ये मधुराणीने पांढऱ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज घातला आहे. तसेच गळ्यात ऑक्साईड ज्वेलरी घातली आहे. तसेच सगळे केस मागे बांधले आहे. यासोबतच रुपालीने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातला आहे. तिने कानात डायमंडचे इअरिंग घातले आहे. तसेच तिने हाय बन घातला आहे. दोघीही या फोटोमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. त्यांचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. (rupali bhosale and madhurani gokhale video viral on social media)
रुपाली भोसले ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. तसेच ती ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात झळकली होती. तसेच मधुराणीने देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. परंतु ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने तिला खास ओळख निर्माण करून दिली आहे. हिंदीमध्ये या मालिकेचा रिमेक चालू आहे. त्या मालिकेचे नाव ‘अनुपमा’ हे आहे.
हेही वाचा :
‘सगळ्यांना सारंगे’, म्हणत स्नेहा वाघने केला तिचा ग्लॅमरस लूक शेअर, बिग बॉसचे मानले आभार
नाचो’, म्हणत ‘मेरा यार’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री प्रिया बापट, २०२२ मधील पहिला व्हिडिओ आला समोर