Friday, October 17, 2025
Home मराठी ‘आई कुठे काय करते’ मालिकेसाठी रुपाली भोसलेला मिळाला ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार, पडतोय कमेंट्सचा पाऊस

‘आई कुठे काय करते’ मालिकेसाठी रुपाली भोसलेला मिळाला ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार, पडतोय कमेंट्सचा पाऊस

मराठी सिनेसृष्टीतील छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही एक ट्रेडिंग मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र लेखकाने उत्कृष्टरीत्या रेखाटले आहे. यातीलच नकारात्मक भूमिका साकारणारी संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले होय. रुपाली नकारात्मक भूमिकेत असूनही प्रेक्षकांमध्ये तिचा चांगलाच दबदबा आहे. रुपाली ही ‘बिग बॉस मराठी २’ ची माजी स्पर्धक होती. त्यानंतर तिच्या चाहत्यावर्गात कमालीची भर पडली आहे. तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

रुपालीला तिच्या भूमिकेसाठी २०२१ चा दादासाहेब फाळके आयकॉन चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने याबद्दल माहिती दिली आहे. रुपालीला ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेसाठी दादासाहेब फाळके आयकॉन चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे.

तिने सोशल मीडियावर तिच्या पुरस्कारासोबत फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये या मालिकेतील इतर कलाकार देखील दिसत आहेत. या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट खलनायिका असे पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे मालिकेची संपूर्ण टीम खूप खुश आहे. (Rupali bhosale get best vilain award in dadsaheb falake award for aai kuthe kay karte serial)

याव्यतिरिक्त चाहत्यांसोबतच कलाकारही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “अभिनंदन डार्लिंग.” दुसऱ्या एका चाहतीने लिहिले की, “मला माझ्या नावावर तुझ्यामुळे गर्व होत आहे.”

मालिकेची कहाणी वेगळी आणि सगळ्यांना भावणारी आहे. त्यामुळे मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. रुपालीने या आधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘कन्यादान’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘महासंग्राम’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच, तिने ‘आयुषमान भव’, ‘कसमे वादे’, ‘बडी दूर से आये हैं’, ‘तेनाली रामा’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लय भारी! ‘बिग बॉस मराठी’च्या चावडीवर येणार ‘भाईजान’, म्हणाला, ‘ओ भाऊ…’

-असे काय घडले की, निलेश साबळे आणि टीमला मागावी लागली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माफी

-कहरच! स्विमिंग पूलजवळ बसून रुचिराने दाखवली तिच्या हॉटनेसची झलक, एक नजर टाकाच

हे देखील वाचा