मराठी सिनेसृष्टीतील छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही एक ट्रेडिंग मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र लेखकाने उत्कृष्टरीत्या रेखाटले आहे. यातीलच नकारात्मक भूमिका साकारणारी संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले होय. रुपाली नकारात्मक भूमिकेत असूनही प्रेक्षकांमध्ये तिचा चांगलाच दबदबा आहे. रुपाली ही ‘मराठी बिग बॉस 2’ ची स्पर्धक होती. त्यानंतर तिच्या चाहत्या वर्गात कमालीची भर पडली आहे. अशातच रुपालीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रुपालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रुपाली नवरीच्या वेशात दिसत आहे. तिने लाल रंगाचा लेहंगा घातलेला आहे. यासोबत तिने हेवी ज्वेलरी घातलेली दिसत आहे. हातात बांगड्या, कपाळी टिकली, केसात गजरा असा सगळा तिने साजशृंगार केला आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. लाल रंगाच्या वर्क केलेल्या या लेहंग्यामध्ये तिचे रूप आणखीनच खुलले आहे. तिचा हा ब्रायडल लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिचे चाहते सातत्याने हा फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. (rupali bhosale share her bridal look photo on social media)
रुपाली ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक बोल्ड अभिनेत्री आहे. तिचा फॅशन सेन्स देखील खूप चांगला आहे. बिग बॉसच्या घरात असताना तिने वेळोवेळी प्रेक्षकांना तिच्या फॅशन सेन्सचे दर्शन दिले आहे.
रुपालीने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘कन्यादान’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘महासंग्राम’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘आयुषमान भव’, ‘कसमे वादे’, ‘बडी दूर से आये हैं’, ‘तेनाली रामा’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका
-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ