Wednesday, July 3, 2024

ऋषी कपूर यांची लाडकी मुलगी रिद्धीमाला मिळाल्या होत्या चित्रपटाच्या ऑफर; त्यांना नाकारत गाजवले ‘हे’ क्षेत्र

बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते म्हणजे राज कपूर. आजही त्यांचा अभिनय अनेक बॉलिवूड कलाकारांसाठी आदर्श आहे. त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी देखील बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले आहे. नातवंडांमध्ये करिना कपूर, रणबीर कपूर, करिश्मा कपूर यांचा समावेश आहे. त्यांच्या अभिनयाचे कोट्यवधी दीवाने आहेत. अभिनयाचे बाळकडू घेऊनच जन्मलेल्या या कलाकारांनी देखील अभिनय क्षेत्रात त्यांची ओळख निर्माण केली आहे. या परिवारातील सर्वात लाडकी म्हणजे दिवंगत अभिनेता ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धीमा कपूर साहनी. घराला चित्रपटसृष्टीचा वारसा असून देखील रिद्धीमाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला नाही. तिला अनेक चित्रपटाच्या ऑफर आल्या होत्या, परंतु तिने सरळ नकार दर्शवला होता.

रिद्धीमाने आज फॅशन दुनियेत तिचे एक नाव बनवले आहे. ती एक प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आहे. तिने एकदा तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, ती जेव्हा किशोर वयात होती, तेव्हा तिला अनेक चित्रपटाच्या ऑफर आल्या होत्या. परंतु तिने ते करण्यास नकार दिला होता.

रिद्धीमाने सांगितले की, तिला चित्रपटसृष्टीपेक्षा काहीतरी वेगळे करायचे होते, तेव्हा तिला ज्वेलरी डिझाईनमध्ये तिचे चांगले भविष्य दिसले आणि तिने तिथे काम करण्यास सुरुवात केली. तिने पुढे सांगितले की, ती जर ज्वेलरी डिझायनर बनली नसती, तर ती एकतर शेफ नाहीतर योगा ट्रेनर बनली असती पण तिने अभिनयाबाबत कधीच विचार केला नाही.

https://www.instagram.com/p/B-8_B8Kn3FG/?utm_source=ig_web_copy_link

अभिनयाबाबत जेव्हा तिला प्रश्न विचारला, तेव्हा तिने सांगितले की, “अरे देवा! आता अभिनय कसा करू? जेव्हा मी लंडनमध्ये होते, तेव्हा मला अनेक चित्रपटाच्या ऑफर आल्या होत्या. परंतु अभिनयामध्ये करिअर करावं हा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. याबाबत मी माझ्या घरच्यांशी देखील बोलले होते.”

रिद्धीमाने पुढे सांगितले की,”लंडनवरून परत आल्यानंतर मी लगेच विवाह बंधनात अडकले. पण मला आजही आठवते, जेव्हा माझं शिक्षण चालू होतं, तेव्हा माझी आई मला चित्रपटाच्या ऑफरबद्दल सांगायची. त्यावेळी मला खूप आश्चर्य व्हायचे की, मी आता काय करू? कारण त्या वेळी मी केवळ 16-17 वर्षाची होते.”

रिद्धीमा ही ‘आर ज्वेलरी’ नावाच्या एका ब्रँडची मालकीण आहे. लग्नानंतर ती परिवारसोबत दिल्लीला राहते. 25 जानेवारी, 2006 मध्ये रिद्धीमाने व्यावसायिक भरत साहनी याच्यासोबत लग्न केले. त्या दोघांना एक मुलगी आहे. तिचं नाव समारा हे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा