सोशल मीडिया हा कलाकारांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यांच्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी कलाकार नेहमीच त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यात ऋतुजा बागवे ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. तिचे अनेक ग्लॅमरस तसेच पारंपारिक लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
ऋतुजाने (rutuja bagwe) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने निळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. फोटोमध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे. ती वेग वेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Rutuja bagwe share her photos on social media)
ऋतुजा बागवे ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक सोज्वळ भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने “माझी स्वप्न सुंदरी,” अशी कमेंट केली आहे. तसेच अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.
यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते.
हेही वाचा :










