Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

गुलाबी साडीमध्ये खुललं ऋतुजा बागवेचं सौंदर्य; पडतोय लाईक्सचा पाऊस

अभिनेत्री ऋतुजा बागवे ही मराठी इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. वेगवेगळ्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. खासकरून ती तिच्या सोज्वळपणासाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर अनेकदा तिचे फोटो शेअर करत राहते. या सुंदर फोटोंमुळे ऋतुजा बऱ्याचवेळा चाहत्यांच्या चर्चेचा विषय देखील बनते.

नुकताच ऋतुजा बागवेचा साडीतील एक फोटो समोर आला आहे. खरं तर तिनेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. यात तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यात ती कमालीची सुंदर आहे. साडीमध्ये ऋतुजाचं सौंदर्य खुललं आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

आता ऋतुजाच्या या पोस्टवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहत्यांशिवाय, मराठी कलाकारही तिच्या या लूकवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री स्पृहा वरद आणि भाग्यश्री मोटेने ऋतुजाच्या सौंदर्याचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. शिवाय ऋतुजाचे बोल्ड फोटोही बऱ्याचदा व्हायरल होत असतात. एकंदरीत प्रत्येक लूक ती अतिशय उत्तमरीत्या कॅरी करते.

सन २००८ मध्ये ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून ऋतुजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’,’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. यानंतर तिने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’ मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. आता अभिनेत्री ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेद्वारे दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येते. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा