Tuesday, June 10, 2025
Home मराठी ऋतुजा बागवेच्या नवीन लूकची सोशल मीडियावर रंगली चर्चा, चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या बटीने सौंदर्यात भर

ऋतुजा बागवेच्या नवीन लूकची सोशल मीडियावर रंगली चर्चा, चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या बटीने सौंदर्यात भर

छोट्या पडद्यावरील अत्यंत सोज्वळ आणि सालस अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे होय. ऋतुजाने अभिनयातून तिच्या चाहत्यांच्या मनावर छाप पाडलीच आहे, पण ऋतुजा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. ती अनेकवेळा साडीमधील फोटो शेअर करत असते. तिचा पारंपारिक अंदाज तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडत असतो. अशातच तिचा एक घायाळ करणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऋतुजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूप मनमोहक दिसत आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा लाँग ड्रेस परिधान केला आहे. ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत. या लूकमध्ये तिचे इअरिंग खूपच आकर्षक दिसत आहे. तिने मोठे डायमंडचे इअरिंग घातले आहे. ज्यामुळे तिचे रूप आणखी खुलले आहे. तिने सगळे केस मागे बांधले आहे. चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या बटीने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.

तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या चाहत्यांनी तिला अनेकवेळा साडीमध्ये पहिले आहे, पण तिचा हा वेगळा लूक चाहत्यांना खूप भावला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. या फोटोवर अभिनेत्री अश्विनी केसर हिने “आँखे,” अशी कमेंट केली आहे. गौरी नलावडे हिने “वाह वाह,” अशी कमेंट केली आहे. तसेच अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिने फायर इमोजी पोस्ट केली आहे. यासोबत अनेक चाहते सातत्याने कमेंट करत आहेत. (rutuja bagwe’s photo viral on social media)

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.

यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’ मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदरा गं माझी’, सायली संजीवच्या स्टायलिश लूकवर ‘या’ अभिनेत्रीची लक्षवेधी कमेंट

-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

हे देखील वाचा