स्टार प्लस टीव्ही मालिका ‘साथ निभाना साथिया’च्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रेम मिळू शकले नाही. आता शोच्या सेटवरून बातम्या येत आहेत की, हा शो लवकरच बंद होणार आहे. या शोचा शेवटचा भाग पुढील आठवड्यात शूट होणार असून, तो होल्डवर ठेवण्यात येणार आहे. प्रेक्षकांना प्रश्न पडलाय की, हा शो अचानक का बंद होत आहे? खरंतर, यामागचं कारण स्वतः गेहानाची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहा जैन (Sneha Jain) हिने सांगितलं आहे.
साल २०२० मध्ये सुरू झालेल्या या शोला सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पण या दोन वर्षांत हा शो टीआरपीच्या यादीत मागे पडला. त्यामुळे निर्मात्यांनी शो ऑफ एअर करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळेलेल्या वृत्तानुसार, मालिकेची स्टारकास्ट पुढील आठवड्यात मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण करेल. ‘साथ निभाना साथिया २’ मध्ये स्नेहा जैन, गौतम विज आणि हर्ष नागर मुख्य भूमिकेत आहेत. (saath nibhaana saathiya 2 will off air next week)
शोची मुख्य अभिनेत्री स्नेहा जैन हिने एका मुलाखतीत शो बंद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. घसरलेल्या टीआरपीमुळे हा शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ती म्हणाली, “मी या शोची स्टारकास्ट आणि सेट्सना मिस करेन कारण मी माझ्या आयुष्यातील दोन वर्षे इथे घालवली आहेत. हा शो नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ असेल. हा माझा पहिला शो आहे आणि या चित्रपटात काम करताना मी काही सुंदर गोष्टी पाहिल्या आहेत.”
खरं तर, शोमध्ये केलेले बदल प्रेक्षकांना आवडले नाहीत. त्यामुळे चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा परिणाम शोच्या रेटिंगवरही दिसून आला. यामुळे आता निर्माते हा शो बंद करणार आहेत. ‘साथ निभाना साथिया’चा दुसरा सीझन मोठ्या थाटात सुरू झाला. मेकर्सनी शोमध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न आणण्याचा प्रयत्न केला पण, प्रेक्षकांनी शो नाकारला. आता हा शो १६ जुलैपासून बंद होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा