Wednesday, June 26, 2024

एक महिन्यांचा झाला पतौडी घराण्याचा छोटा नवाब, आत्या सबा अली खानने शेअर केले गोंडस फोटो

काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान आणि करीना कपूर पुन्हा एकदा पालक बनले आहेत. फेब्रुवारी महिन्यात 21 तारखेला करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. मुंबईतील रुग्णालयात प्रसूतीनंतर करीना 2 दिवसांनी घरी परतली होती. पतौडी कुटुंबात नवीन पाहुण्याचे आगमन झाल्यापासून खूप आनंदाचे वातावरण आहे. आई-वडिलांशिवाय या छोट्या पाहुण्याला आजी-आजोबा, आत्या, मावशी यांचे खूप प्रेम मिळत आहे. आत्या सबा अली खानला बऱ्याचवेळा सोशल मीडियावर प्रेम व्यक्त करताना पाहिले गेले आहे.

आता हा छोटा पाहुणा 1 महिन्याचा झाला आहे, या निमित्ताने आत्या सबाने इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. हा तीन फोटोंचा एक कोलाज आहे, ज्यामध्ये पहिल्या फोटोत हातमोजे घातलेले लहान हात दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत करीना आपल्या मुलासोबत दिसत आहे आणि तिसर्‍या फोटोमध्ये सैफ अली खान देखील दिसला आहे.

मुलाच्या जन्मानंतर एक महिना पूर्ण झाल्याच्या आनंदात, सैफची बहीण सबा पतौडीने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. याशिवाय तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तैमूर दिसत आहे. या फोटो कोलाजच्या माध्यमातून ती आनंदी आणि परिपूर्ण कुटुंबाचे संकेत देत आहे.

हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत. सैफीनाच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या मुलाचे नवनवीन फोटो पाहण्याची खूप उत्सुकता आहे. महिला दिनाच्या निमित्ताने करीनाने आपल्या मुलाची पहिली झलक चाहत्यांसह शेअर केली होती. हा फोटोही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.

सैफीनाच्या चाहत्यांना छोट्या पाहुण्याचे हे फोटो खूपच आवडले आहे आणि त्यांनी फोटोवर भरभरून प्रेमही व्यक्त केले आहे. त्याचवेळी काही नेटकरी त्यांना मुलाचे नाव विचारत आहेत. कोरोनाच्या साथीमुळे सैफ-करीना सुरक्षेची विशेष काळजी घेत आहेत. कामाबद्दल बोलायचे झाले, तर सैफ ‘भूत पुलिस’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सैफ व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस, अर्जुन कपूर आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत. त्याचवेळी करीना आमिरसोबत ‘लालसिंग चड्ढा’ मध्ये दिसणार आहे.

हे देखील वाचा