Thursday, January 16, 2025
Home बॉलीवूड ‘साबरी ब्रदर्स’ची जोडी तोडून, एक बंधू काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध कव्वाल फरीद साबरी यांचे निधन

‘साबरी ब्रदर्स’ची जोडी तोडून, एक बंधू काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध कव्वाल फरीद साबरी यांचे निधन

बॉलिवूडमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. जयपूरचे प्रसिद्ध कव्वाल फरीद साबरी यांचे बुधवारी (२१ एप्रिल) सकाळी निधन झाले. बॉलिवूडमध्ये राजस्थानचे नाव उज्ज्वल करणाऱ्या साबरी यांनी हे जग कायमचे सोडले. त्यांना न्यूमोनिया झाला होता, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले गेल्याचे असे सांगण्यात आले होते, परंतु बुधवारी सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

फरीद साबरी यांचे भाऊ अमीन साबरी यांनी माहिती दिली की, त्यांची तब्येत मंगळवारी (२० एप्रिल) रात्रीच बिघडली होती. याच्या अगोदर त्यांची तब्येत तशी जास्त खराब नव्हती. डॉक्टरांनी सांगितले की, मधुमेहामुळे त्यांच्या मूत्रपिंडावर आणि फुफ्फुसांवर फारच परिणाम झाला होता. यात त्यांना न्यूमोनिया देखील झाला.

फरीद साबरी यांचे पार्थिव शरीर जयपूर येथील त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थान मुथरा यांच्या वाड्यात आणण्यात आले. दुपारनंतर सर्व शेवटच्या विधी पूर्ण झाल्या. त्यांना मस्किनी शाह स्मशानभूमीत दफन करण्यात आले.

अमीन साबरी यांनी सांगितले, “आम्ही लोकांना आवाहन करत आहोत की, अंत्यसंस्कारात अधिक लोकांनी सहभागी होऊ नये. कारण कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूची चैन तोडण्यासाठी त्यांच्या अंत्यसंस्कारात कमीच लोक सामील होणे आवश्यक आहे.”

सुफी कव्वाली गायक सईद साबरी यांचे दोन्ही पुत्र म्हणजेच, फरीद साबरी आणि अमीन साबरी हे ‘साबरी ब्रदर्स’ म्हणून परिचित होते. जयपुरमध्ये साबरी बंधू दीर्घकाळापासून कव्वाली गात आले आहेत. त्यांची कव्वाली देश-विदेशातही खूप प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, त्यांची जोडी बॉलिवूडची एक सुपरहिट जोडी होती. त्यांनी केवळ ‘सिर्फ तुम’ मधील ‘एक मुलाकात जरुरी है सनम’ आणि ‘हिना’ चित्रपटातील ‘देर ना हो जाए’ ही गाणी गायली होती, जी प्रचंड सुपरहिट ठरली. अशामध्ये, साबरी बंधूंची जोडी तोडून, फरीद साबरीचे या जगातून निघून जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानला पितृशोक, हृदयविकारामुळे वडिलांनी घेतला जगाचा निरोप

-काय सांगता! खऱ्या आयुष्यात देखील शिवाजी साटम यांना बनावे लागले होते ‘सीआयडी’, वाचा त्यांचा प्रवास

-जर कॉमेडीचा शहेनशाह सतिश कौशिकचा अस्सल अभिनय पाहायचा असेल तर हे पाच सिनेमे नक्की पाहा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा