Wednesday, July 3, 2024

प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीला मंगळसुत्राची जाहिरात करणे पडले महागात, धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी सध्या त्यांच्या मंगळसूत्राच्या जाहिरातीवरून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले असून त्यांच्या जाहिरातीमध्ये दाखवलेल्या एका फोटोवरून त्यांना जोरदार ट्रोल केल जात आहे. याच पार्श्वभूमीवर आशुतोष दुबे नावाच्या एका वकिलांनी या जाहिरातीवर आक्षेप घेत सब्यासाची यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे फॅशन डिझायनर सब्यासाची यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची यांनी नुकतीच त्यांच्या मंगळसुत्राच्या डिझाईनची जाहिरात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली होती. यामध्ये दाखवलेल्या फोटोवरून आता जोरदार वाद सुरू झाला आहे. या जाहिरातीत दाखवलेल्या मंगळसूत्राच्या फोटोसाठी अर्धनग्न मॉडेलचा वापर केल्यामुळे आशुतोष दुबे नावाच्या राजकीय प्रवक्त्याने सब्यासाची यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या मंगळसूत्राची अत्यंत बारकाईने रचना केली गेली असून, त्याचाच फोटो सब्यासाची यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये एक मॉडेल मंगळसूत्र घालून उभी असल्याचे दिसत असून, सोबतच या मॉडेलसोबत एक शर्टलेस युवक उभा असल्याचे दिसत आहे. ज्यामुळे हा सगळा वाद निर्माण झाला आहे.

https://www.instagram.com/p/CVhF-8OPxJY/?utm_source=ig_web_copy_link

ही जाहिरात पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सब्यासाची यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यामध्ये सब्यासाची कंडोमची जाहिरात करत असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. तर अनेकांनी हा फोटो म्हणजे हिंदू धर्मावर हल्ला असून धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप केला आहे. याबद्दल संताप व्यक्त करताना एका युजरने लिहिले, “तुम्ही नक्की कशाची जाहिरात करत आहात?” असा प्रश्न विचारला आहे. सोबतच “आता हा दागिना कोणीही घालणार नाही. कारण तुम्ही दुनियेला दाखवून दिले आहे की, मी जर हा दागिना घातला तर मी एक नालायक बाई आहे.” असे म्हणत नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली असून कृपया आपल्या जाहिरातींकडे लक्ष द्या असा सल्लाही दिला आहे.

फोटोमध्ये अंतर्वस्त्र घालून एक महिला मंगळसूत्राची जाहिरात करताना दिसत आहे. ज्यावर लोकांकडून जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. यावर नाराजी व्यक्त करत एका युजरने” ह्याच्यावर बंदी घाला, आता हा अश्लील दागिन्यांचा अड्डा झाल्याचा” आरोप केला आहे. सब्यासाची हे प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून बॉलिवूडमधील मोठमोठ्या अभिनेत्रींसाठी ड्रेस डिझाइन केले आहेत. सब्यासाची आपल्या दागिन्यांमध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करताना दिसतात. मात्र यावेळी त्यांना अशा प्रकारची जाहिरात करणे चांगलेच महागात पडले आहे.

https://www.instagram.com/p/CVhGCeVvSzH/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान डिझायनर सब्यासाची याआधी सुद्धा अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले होते. काही दिवसांपूर्वी H&M च्या सहकार्याने त्यांनी एक कलेक्शन लॉन्च केले होते. त्याचे हे कलेक्शन काही मिनिटांतच विकले गेले, पण डिझायनरला मीम्ससह वेगवान फॅशनचा प्रचार केल्याबद्दल ट्रोल केले गेले. याआधीही अनेकदा सब्यसाचीच्या उत्पादनावर अनेकदा बहिष्कार टाकण्याची मागणी केली गेली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भर गर्दीत ‘मन्नत’च्या बाहेर हनुमान चालीसाचा जप करताना दिसले पंडितजी, पाहा व्हिडिओ

-मोठी बातमी! आर्यन खान आर्थर रोड कारागृहातून बाहेर, लवकरच होणार मन्नतवर रवाना

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

-काय सांगता! जामीन तर मिळणार, परंतु न्यायालयाने आर्यनसमोर ठेवल्या ‘या’ एकूण ११ अटी

हे देखील वाचा