Thursday, July 31, 2025
Home मराठी पिळगावकर जोडप्याने मराठमोळ्या अंदाजात दिल्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा, फोटो होतोय व्हायरल

पिळगावकर जोडप्याने मराठमोळ्या अंदाजात दिल्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा, फोटो होतोय व्हायरल

भारतात सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत असतात. अशातच भारतात सर्वत्र दीपावली हा सण साजरा केला जात आहे. दिव्यांच्या प्रकाशात उजळून टाकणारा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पुरातन काळातील कथेनुसार यावेळी श्रीराम प्रभू त्यांचा १४ वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परत आले होते. त्यावेळी सर्वांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्या दिव्यांच्या प्रकाशात चमकवली होती. तेव्हापासून सर्वत्र दिव्यांच्या प्रकाशात सर्वांना प्रकाशमान करणारा हा सण दीपावली म्हणून साजरा केला जातो. सणानिमित्त अनेक कलाकार दीपावलीच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच मराठमोळी जोडी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, दोघेही पारंपारिक पोशाखात दिसत आहे. सुप्रिया यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे तर सचिन यांनी केशरी रंगाचा कुर्ता घातला आहे. (Sachin pilgaonkar and Supriya pilgaonkar give best wishes of diwali on social media)

हा फोटो शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.” त्यांच्या या फोटोवर त्यांचे अनेक चाहते कमेंट्स करत आहेत. अनेकजण त्यांच्या जोडीचे कौतुक करत आहेत, तर अनेकजण त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत आहेत.

सचिन पिळगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील बहुगुणसंपन्न कलाकार आहेत. त्यांचा गायन, डान्स, अभिनय, दिग्दर्शन, निर्माते या सगळ्यात मोलाचा वाटा आहे. तसेच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांनी ‘अशी ही बनवा बनवी’, ‘एकुलती एक’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘आम्ही सातपुते’, ‘माझा पती करोडपती’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांची मुलगी श्रिया ही देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पतीसोबतच्या फोटोवर युजरने केली ‘अशी’ कमेंट, ती पाहून सोनालीला द्यावी लागली त्याला प्रतिक्रिया

-कातिलाना! सोनालीने सादर केला तिचा ‘हॅलोविन’ लूक; चाहते सोडा, सेलिब्रिटीही पडतायत तिच्या प्रेमात!

-‘ …तू माणूस म्हणून बी किंग हाय’ वाढदिवशी मराठमोळ्या किरण मानेने भन्नाट अंदाजात दिल्या शाहरुख खानला शुभेच्छा

हे देखील वाचा