Monday, July 1, 2024

सचिन पिळगावकर कुटुंबासोबत गोव्यामध्ये करतायत वीकेंड एन्जॉय, सुंदर फोटोंमध्ये पाहायला मिळाली झलक

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध आणि रोमँटिक जोडपे म्हणजेच सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर होय. नव्वदच्या दशकात या जोडीने चित्रपटसृष्टी गाजवली आहे. त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. तिथूनच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. आजही त्यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर आहे. अशातच सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सचिन पिळगावकर यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्यांच्यासोबत सुप्रिया पिळगावकर आणि त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर दिसत आहे. ते तिघेही गोव्याला एन्जॉय करताना दिसत आहेत.

हे फोटो शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “या आठवड्यात आम्ही गोव्याला वीकेंड घालवण्यासाठी गेलो आहोत, जिथे श्रिया आधीपासून शूटिंग करत होती. छोटीसी ट्रिप आहे, पण आम्ही खूप एन्जॉय करत आहोत. यासोबतच आम्ही कुलदेवी, मंगेशी आणि महालक्ष्मीचे देखील दर्शन घेतले आहे. पावसाने सगळे वातावरण रम्य झाले आहे.”

त्यांच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. या फोटोवर निवेदिता सराफ यांनी “लव्हली,” अशी कमेंट केली आहे. अली असगर यांनी हार्ट ईमोजी पोस्ट केला आहे. तसेच त्यांचे अनेक चाहते देखील या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

सचिन पिळगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील बहुगुणसंपन्न कलाकार आहेत. त्यांचा गायन, डान्स, अभिनय, दिग्दर्शन, निर्माते या सगळ्यात मोलाचा हातखंडा आहे. तसेच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी ‘अशी ही बनवा बनवी’, ‘एकुलती एक’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘आम्ही सातपुते’, ‘माझा पती करोडपती’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांची मुलगी श्रिया ही देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हाय गर्मी! अमृता खानविलकरच्या हॉट फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, एकदा पाहाच

-जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट

-राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे

हे देखील वाचा