Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड ‘वयाच्या १७ व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता..’लोकप्रिय अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

‘वयाच्या १७ व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता..’लोकप्रिय अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

सैफअली खान (saif ali khan) आणि नवाझुद्दीन सिद्दीकी (navajun siddiqui)  यांची प्रमुख भूमिका असलेली सेक्रेड गेम्स ही वेबसिरीज प्रचंड गाजली होती. या प्रमुख अभिनेत्यांबरोबरच सिरीजमध्ये कुकूची भूमिकाही प्रचंड लोकप्रिय ठरली. ही कुकूची भूमिका अभिनेत्री कुब्रा सैतने (kubbra sait)भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेने सिरीजमध्ये सर्वांचेच लक्ष वेधले होते. सध्या ती तिच्या ओपन बुक या पुस्तकामुळे चांगलीच चर्चेत आली आहे कारण या पुस्तकात कुब्राने तिचे वयाच्या १७ व्या वर्षीच लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. 

अभिनेत्री कुब्रा सैतने तिच्या या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यामध्ये तिने तिच्यावर वयाच्या १७ व्या वर्षीच तिच्या ओळखीच्याच पुरूषाने बलात्कार केल्याचा खुलासा केला आहे. याबद्दल लिहताना कुब्राने “ही घटना झाली त्यावेळी ती 17 वर्षांची होती. त्या दिवसांत ती बंगळुरू येथील रेस्टॉरंटमध्ये तिच्या कुटुंबासोबत जात असे. तिथला मालकाची तिच्याशी आणि तिच्या भावाशी चांगलीच ओळख झाली. त्या व्यक्तीने आईला आर्थिक मदत केली होती. या मदतीनंतर लगेचच त्या व्यक्तीने तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. त्या माणसाने त्याला काका म्हणू नकोस,” असेही सांगितले.

या घटनेबद्दल या पुस्तकात कुब्राने लिहले की, “माझ्या आईने तिला पैसे परत करण्याचा विचार केला तेव्हा मलाही आनंद झाला. मग त्याचा एक हात गाडीच्या मागच्या सीटवर गेला जिथे मी बसले होते आणि माझा ड्रेस सरकवला. त्या क्षणी मला आश्चर्य वाटले. तो पुन्हा पुन्हा आमच्या घरी यायला लागला आणि आई त्याच्याबरोबर बोलायची. त्याच्यासाठी जेवणही बनवायची. तिच्यासमोर तो माझ्या गालाचे चुंबन घेई. आणि माझे कौतुक करत असे. पण मी गप्प राहण्याशिवाय काहीच करु शकत नव्हती.”

याबद्दल कुब्राने अधिक माहिती देताना तो माणूस विवाहित होता आणि त्याला एक मूल होते. या सर्व गोष्टींबाबत आपल्या आईला काहीही माहिती नसल्याचे कुब्राने सांगितले. तिच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं ज्याला ती या गोष्टी सांगू शकेल. आपल्या लैंगिक शोषणाबाबत घरच्यांना सांगितल्यास आपल्याला संपवून टाकू, अशी धमकीही त्या व्यक्तीने दिल्याचे कुब्रा म्हणाली.

हे देखील वाचा