Wednesday, June 11, 2025
Home बॉलीवूड पडद्यावर प्रत्येक पात्र जिवंत करणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा निर्णय; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

पडद्यावर प्रत्येक पात्र जिवंत करणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा निर्णय; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’सह ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. तो आपले प्रत्येक पात्र पडद्यावर जिवंत करण्यासाठी ओळखला जातो.  २०१८ मध्ये आलेल्या या सीरिजला पहिल्या भागाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्याचवेळी २०२० मध्ये आलेल्या त्याच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी पाठिंबा दिला होता. मात्र, नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दल अशी माहिती समोर येत आहे की, तो ओटीटी प्लॅटफॉर्म सोडण्याचा विचार करत आहे. तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरून निवृत्त होत असल्याचेही बोलले जात आहे.

‘या’ सीरिजमध्ये केला शानदार अभिनय
नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘सेक्रेड गेम्स’ दोन भागात प्रदर्शित झाला. या वेबसीरिजशिवाय तो ‘सीरियस मॅन’, ‘रात अकेली है’ आणि ‘घूमकेतू’मध्ये देखील दिसला आहे. नवाजुद्दीनने या सर्व सीरिजमध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र, यादरम्यान समोर येणारी बातमी ऐकून नवाजुद्दीनच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसणार आहे.

ओटीटीवर नाही मजेदार कंटेट
नवाजुद्दीनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ओटीटीला कायमचा अलविदा करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले. माध्यमांतील वृत्तांनुसार, नवाजुद्दीनला असे वाटते की, डिजिटल प्लॅटफॉर्मवरील सामग्री दिवसेंदिवस खराब होत आहे. ओटीटीवर पूर्वीसारखा शक्तिशाली कंटेंट दाखवला जात नाही. मेकर्स आता जुन्या सीरिजचा सिक्वेल बनवून प्रेक्षकांसमोर सादर करत आहेत, ज्यामध्ये दाखवण्यासारखे काही नाही.

‘यामुळे’ ओटीटी सोडण्याचा घेतला निर्णय
माध्यमांतील वृत्तांमध्ये असेही म्हटले आहे की, जेव्हा नवाजुद्दीनने ‘सेक्रेड गेम्स’मध्ये पहिल्यांदा काम केले होते, तेव्हा तो या सीरिजबद्दल खूप उत्सुक होता आणि त्याने ते आव्हान म्हणून घेतले होते. नव्या टॅलेंटला संधी मिळत होती, त्यामुळे तो खूश झाला. मात्र, आता अशा गोष्टी दिसत नाहीत. त्याच्या मते, आता ओटीटी शोचा सामना करणे खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत अशा कंटेंटचा भाग बनू इच्छित नाही. या कारणांमुळे त्याने वेबसीरिजला अलविदा केल्याचीही शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीला मंगळसुत्राची जाहिरात करणे पडले महागात,धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

-छळ आणि दुसरे लग्न केल्याच्या आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, पत्नीने केला होता गुन्हा दाखल

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

हे देखील वाचा