Tuesday, October 14, 2025
Home वेबसिरीज सागरिका घाटगे आणि झहीर खान होणार आई वडील?

सागरिका घाटगे आणि झहीर खान होणार आई वडील?

यावर्षी बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली. आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार असे दिसते आहे की लवकरच अभिनेत्री सागरिका घाटगे आणि तिचा पती आणि माजी क्रिकेटपटू झहीर खान देखील त्या यादीमध्ये सामील होतायत. होय, अनेक स्त्रोत्यांच्या मते सागरिका आणि झहीरसुद्धा त्यांच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहेत.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, सागरिका आणि झहीर लवकरच पालकत्व अनुभवणार आहेत. या जोडप्याच्या मित्रांनी या गोष्टीची पुष्टी केली आहे. मात्र झहीर आणि सागरिका या दोघांनी अद्याप या विषयी काहीही भाष्य केलेलं नाही. सागरिका सध्या यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलसाठी पतीसमवेत युएईमध्ये आहे. झहीर मुंबई इंडियन्स या संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.

सागरिका आणि झहीर हे आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारशे चर्चा करताना दिसत नाहीत. त्यामुळेच कदाचित त्यांची आनंदाची बातमी आपल्याला आगमनानंतरच कळेल असे दिसते आहे. सागरिका आणि झहीरने नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नात बॉलिवूड आणि क्रीडा विश्वातील अनेक नामवंत लोकांनी हजेरी लावली होता.

हे देखील वाचा