मिस्टर इंडिया असणाऱ्या बॉडी बिल्डर मनोज पाटीलने १५ सप्टेंबर रोजी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मनोज पाटीलवर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या संपूर्ण प्रकरणात अभिनेता साहिल खानचा उल्लेख आल्याने हे प्रकरण जरा जास्तच प्रकाशझोतात आले. मनोजने त्याच्या सुसाईट नोटमध्ये साहिल खानने त्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे लिहले होते.
या घडलेल्या घटनेवर आता अभिनेता साहिल खानने त्याची बाजू मांडली असून, या प्रकाराला पब्लिसिटी स्टंट सांगितले आहे. साहिलने एका मुलाखतीमध्ये या संपूर्ण प्रकारावर त्याची बाजू मांडताना सांगितले की, “मी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज फौजदार या देखील राहणाऱ्या मुलाला भेटलो होतो. त्याने एक व्हिडिओ बनवला होता ज्यात सांगितले होते की, मनोज पाटीलने त्याच्याकडून २ लाख रुपये घेतले आणि त्याला एक्सपायर्ड झालेले स्टेरॉयड विकले. त्यानंतर त्याला हृदय आणि त्वचेच्या संबंधित समस्या जाणवू लागल्या. फौजदारकडे पैशाची जी देवाण घेवाण झाली त्या संदर्भातल्या सर्व पावत्या उपलब्ध आहे. राजला यासाठी सोशल मीडियाचा पाठिंबा आणि मदत पाहिजे होती. म्हणूनच मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करत याला लोकांचे समर्थन मागितले.”
पुढे साहिल म्हणाला, “मी सांगितले होते की, स्टेरॉयडचे रॅकेट बंद झाले पाहिजे. राज फौजदार सांगत होता की, मनोज त्याचे पैसे त्याला परत देत नाहीये. राजने त्याला पैसे देण्यासाठी त्याची बाईक देखील विकली होती. मला आश्चर्य वाटते की मनोजने त्याच्या सुसाईड नोटमध्ये राज किंवा या संपूर्ण प्रकारचा उल्लेख का केला नाही.”
स्वतःला निर्दोष सांगताना साहिल म्हणाला, “मी फक्त त्या मुलाला पाठिंबा देत स्टेरॉयड विकण्याच्या विरोधात उभा राहिलो. आपल्या देशात स्टेरॉयड विकणे हा एक गुन्हा आहे. एक्सपायर्ड स्टेरॉयड घेतल्यानंतर जर त्या मुलाचा मृत्य झाला असता तर? माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसून हा एक पब्लिसिटी स्टंट आहे बस बाकी काही नाही.”
बुधवारी रात्री मनोज पाटीलने विषारी गोळ्या घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. अभिनेता साहिल खानच्या त्रासाला कंटाळून मनोज पाटीलने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रात्री झोपताना कोणीतरी दाबायचे हेमा मालिनींचा गळा; अभिनेत्रीने सांगितली ‘झपाटलेल्या’ घराची कहाणी
-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा
-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप