Sunday, February 8, 2026
Home बॉलीवूड हीच का ती ‘हम आपके है कौन’मधील रीटा? लेटेस्ट फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण

हीच का ती ‘हम आपके है कौन’मधील रीटा? लेटेस्ट फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी अनेक स्टार्स मुंबईत येतात. काहींना चित्रपटात काम करून यश मिळते, तर काही अनेक चित्रपटात दिसल्यानंतरही अज्ञात राहतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shahrukh Khan), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांसारख्या स्टार्ससोबत काम केले, पण तरीही तिला फिल्मी दुनियेत अपेक्षित स्थान मिळवता आले नाही.

या अभिनेत्रीचे नाव आहे साहिला चढ्ढा (Sahila Chadha), जिला तुम्ही सर्वात यशस्वी चित्रपटांपैकीच एक ‘हम आपके है कौन’मध्ये आपण पाहिलेच असेल. या चित्रपटात साहिलाने रीटा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती, जी सलमान खानवर लाईन मारताना दिसत होती. एवढ्या मोठ्या चित्रपटात काम करूनही साहिलाची कारकीर्द अपेक्षित टप्प्यापर्यंत पोहोचली नाही. (sahila chadha hum aapke hain kaun latest look will surprise you)

अभिनेत्री साहिला चड्डा ही ९०च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. तिने पन्नासपेक्षा जास्त चित्रपटात काम केले यामध्ये सलमान खानसोबतही तिने भूमिका साकारल्या आहेत. मात्र इतक्या चित्रपटात काम करूनही आणि इतकी लोकप्रिय होऊनही ती पुन्हा चित्रपटात काम करायची कमी झाली. अभिनेत्री साहिला चड्डाने मिस वर्ल्डचा किताब सुद्धा आपल्या नावावर केला होता.

म्हणतात ना कितीही मेहनत घेतली तरी शेवटी नशिबाचीसुद्धा साथ लागते. साहिलाच्या बाबतही असेच काहीतरी झाले. तिचे वडीलसुद्धा चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. मात्र साहिला लहान असतानाच तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे लहानपणीच तिच्यावर मोठी जबाबदारी पडली. साहिला लहानपणापासूनच अत्यंत हुशार होती. तिने खूप कमी वयात मॉडेलिंग करायला सुरुवात केली. मिस वर्ल्डचा किताब मिळवण्याआधी तिने अनेक मानाचे पुरस्कार पटकावले होते.

मॉडेलिंगच्या दुनियेत काम करत असताना ती मिस इंडिया बनली आणि जवळपास २५ पुरस्कार जिंकले. ‘शीला’ हा तिचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट होता. आता ती स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालवते आणि टीव्ही शोसह वेबसिरीजही बनवते.

 

हे देखील वाचा