बॉलिवूडमध्ये पाहायला गेलं तर अनेक चित्रपट आणि गाणी येत असतात. पण त्यातील काही गाणी अशी असतात जी सर्वांना डान्स करण्यासाठी प्रवृत्त करतात. यातील या वर्षाचे एक सुपरहिट गाणे म्हणजे ‘परम सुंदरी’. क्रिती सेननच्या ‘मिमी’ चित्रपटातील हे गाणे गेल्या काही दिवसापासून चांगलेच ‘गाजले आहे. चित्रपटात स्वतः क्रितीने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. यामधील तिच्या डान्स स्टेप्स देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या आहेत. सोशल मीडियावर या गाण्याच्या रील्स मोठ्या संख्येने बनवल्या जात आहेत. अनेक कलाकार देखील या गाण्यावर रिल्स बनवत आहेत. अशातच बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर हिने देखील या गाण्यावर एक व्हिडिओ केला आहे. जो सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
सईने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘परम सुंदरी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती क्रिती सेननप्रमाणे डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाची आणि सोनेरी रंगाची बॉर्डर असलेली साडी परिधान केली आहे. यासोबत तिने मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे. तिने गळ्यात एक नेकलेस तसेच मॅचिंग कानातले घातले आहेत. यावर तिने काळ्या रंगाची टिकली लावली आहे आणि सगळे कस मोकळे सोडले आहे. ज्यामध्ये ती अगदीच सुंदरी दिसत आहे. (sai lokur dance on param sundari song, video get viral)
हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “परम सुंदरी इन सारी.” तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला या आहे. अनेकजण या व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊन तिच्या डान्सचे कौतुक करत आहेत.
सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘किस किस को प्यार करू’, ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘जरब’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’, ‘मी आणि तू’, ‘स्माईल प्लिज’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…